यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजीनगर, दि. २० :प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंत अधिकारी-कर्मचारी तसेच आदर्श ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांचा सन्मान सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात विभागीय आयुक्त पापळकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला आस्थापना विभागाचे अपर आयुक्त राजेंद्र अहिरे, गटविकास अधिकारी राजेंद्र महाजन, कक्ष अधिकारी मिलिंद म्हस्के, दिलीप भूमरे, अनिल टेकाळे, सुवर्णा शिदे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

गुणवंत अधिकारी-कर्मचारी सन्मानित

मिलिंद पाराजीराव तुरूकमारे – विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद बीड

सुनील शिवाजीराव नवले – सहायक प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद बीड

मनोजकुमार मोहनराव येरोळे – सहायक लेखाधिकारी, जिल्हा परिषद लातूर

मण्मथ धोंडिबा मुक्तापुरे – कृषी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर

सचिन वैजनाथ काडवादे – कनिष्ठ प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद लातूर

आदर्श ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक सन्मानित

शितल त्र्यंबकराव उमप – ग्रामसेवक, पोखरी (संभाजीनगर)

नंदकिशोर विनायकराव वानखेडे – ग्रामविकास अधिकारी, जालना

सुखदेव देवसिंग शेळके – ग्रामविकास अधिकारी, जालना

मधुकर मानसिंग मोरे – ग्रामसेवक, नांदेड

पुष्पा बालासाहेब काळे – ग्रामसेवक, परभणी

विजयसिंह विलासराव नलावडे – ग्रामविकास अधिकारी, धाराशिव

धनंजय रामराव भोसले – ग्रामसेवक, लातूर

गोपीनाथ भीमराव इंगोले – ग्रामसेवक, हिंगोली

०००