पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सत्कार, विविध पुरस्कारांचे वितरण

 वीर नारी, वीर मातेचा सत्कार; उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

यवतमाळ दि. १५ (जिमाका): भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते वीर नारी, वीर मातांचा सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव व विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीर नारी मंगला देवचंद सोनवणे, नंदाबाई दादाराव पुरम, सुनिता प्रकाश विहीरे, वीर माता लक्ष्मीबाई यशवंत थोरात यांचा सत्कार करण्यात आला. शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत विभागस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विभागीय वन अधिकारी कार्यालयातील दादा विष्णु राऊत, तालुकास्तरीय कार्यालय दुसरा टप्पा मध्ये प्रथम पुरस्काराबाबत वणी तहसिलदार निखित धुळधर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, बालसंरक्षण अधिकारी विजया देवपारे, दारव्हा मुध्याधिकारी विठ्ठल केदारे, राळेगाव सहाय्यक निबंधक अजित डेहणकर, दिग्रस उप कोषागार अधिकारी रंगराव चव्हाण, दिग्रस तालुका कृषी अधिकारी सचिन हरणे, द्वितीय क्रमांकाबाबत घाटंजी उप अधीक्षक भूमी अभिलेख निरंजन पवार, नेर पोलिस स्टेशनचे रोहित ओव्हाळ, पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. वैषाली सातुलवार, यवतमाळ गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, तृतीय क्रमांकाबाबत यवतमाळ येथील उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, दुय्यम निबंधक श्रीकांत पावडे, जीवन प्राधिकरणचे उप अभियंता प्रशांत उमप, आर्णी येथील जलसंपदाच्या उप अभियंता स्नेहल सावसाखळे यांचा गौरव करण्यात आला.

नेत्रदानाचा संकल्प केल्याबद्दल अवयवदात्याचे नातेवाईक राजेश देशपांडे, रुपाली केवटे यांचा सत्कार करण्यात आला. मास्टर्स ॲथलॅटिक्स या खेळ प्रकारामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होवून पदक प्राप्त केल्याबद्दल यशवंतराव इसराणी, जखमी व्यक्तीस तत्काळ मदत केल्याबद्दल कवठा बाजार येथील शिक्षक किशोर बनारसे यांचा गौरव करण्यात आला. वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत भरीव कामगिरी केल्याबद्दल सहाय्यक महसूल अधिकारी विलास वानखेडे, जिल्हा वनहक्क व्यवस्थापक रुपेशकुमार श्रृपकार यांचा गौरव करण्यात आला.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आल्याबद्दल पुसद येथील विद्यार्थी सार्थक दिपक भवरे, स्वरा पवन बोजेवार व समर शंकर कोकरे यांचा गुणगौरव करण्यात आला. अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेतील विजेती विद्यार्थीनी जान्हवी दादाराव माहुरे हीचा गौरव करण्यात आला.

पोलिस विभागात विशेष गामगिरी करणारे पोलिस निरिक्षक ज्ञानोबा देवकते, पोलिस हवालदार प्रदीप तांबेकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक मनिष तांबे, सहाय्यक पोलिस निरिक्षक शुभांगी गुल्हाने, पोलीस शिपाई रोशनी डफाळ तसेच उत्कृष्ट तपास केल्याबद्दल यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, पोलीस उपनिरिक्षक गजानन राजमल्लु, पोलीस हवालदार रुपेश पाली, अंमलदार आकाश सूर्यवंशी,  पोलिस स्टेशन पांढरकवडा येथील पोलिस निरिक्षक दिनेश झांबरे, पोलीस नाईक राजू मुत्यलवार, पोलीस स्टेशन लाडखेड येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक विनायक लंबे, हवालदार नितीन सलाम, पोलीस नाईक उमेश शर्मा, पोलीस स्टेशन घाटंजी येथील पोलीस निरिक्षक केशव ठाकरे, हवालदार दिनेश जाधव, आरसीपी पथक पुसद येथील पराग गिरनाळे व शुद्धोधन भगत, महिलांविरुद्ध दाखल गुन्ह्यांमध्ये गतीने दोषारोपपत्र दाखल करणारे यवतमाळ शहरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक देवेंद्र तिवारी, पोलीस स्टेशन महागावचे हवालदार विनोद जाधव व पोलीस स्टेशन वसंतनगरचे हवालदार विष्णु नालमवार यांचा गौरव करण्यात आला.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य आवास योजना ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल दिग्रस, महागाव, नेर, बाभुळगाव, दारव्हा, वणीचे गटविकास अधिकारी तसेच दारव्हा तालुक्यातील गोरेगाव, पुसद तालुक्यातील गायमुख, कळंब तालुक्यातील मालवणी, यवतमाळ तालुक्यातील बोरगाव, दिग्रस तालुक्यातील पेलु व आर्णी तालुक्यातील तेंडुळी या गावाचे सरपंच व सचिवांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महाआवास अभियानांतर्गत आर्णीचे विस्तार अधिकारी ईश्वरसिंग बघेल, केळापूरचे ज्ञानेश्वर कुळसंगे, महागावचे युवराज देशमुख या विस्तार अधिकाऱ्यांना तसेच दारव्हा येथील नितीन कोल्हे, आर्णी येथील बुद्धकिरण मुनेश्वर, कळंबचे अमित राठोड, यवतमाळ रोहीत शिरभाते, झरी येथील आदर्श ऐतवार या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. डाटाएंट्री ऑपरेटर दारव्हा रवींद्र कदम, दिग्रस विजय पाईकराव, महागाव राजिक युसुफ सय्यद, यवतमाळ सारीका कुकडे, राळेगाव येथील लोकेश धोटे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील ऑपरेटर राहुल लहाडके तसेच विवेक गुघाने यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

०००