कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि.15 ऑगस्ट- जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते आज सातूपर येथील कर्मचारी राज्य विमा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे लोकर्पण झाले. यावेळी आमदार सीमा हिरे, डॉ.बी.एम पावरा, वैद्यकीय प्रशासन अधिकारी राजश्री पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश दांडगे, वैद्यकीय अधिकारी सरोज जवादे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


सातपूर येथील कर्मचारी राज्य विमा रूग्णालय गेली 35 वर्षांपासून कामगारांच्या सेवेत आहे. आज 3.5 कोटी निधीतून उभारण्यात आलेले 10 खाटांचे अतिदक्षता विभागाचा लाभ जिल्ह्यातील कामगारांना होणार आहे. यातून कामगारांना  दर्जेदार व तत्काळ स्वरूपाच्या आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
00000