महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा

निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण

नवी दिल्ली, १५ : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनामध्ये निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कोपर्निकस मार्ग स्थित आणि कस्तुरबा गांधी मार्ग स्थित  महाराष्ट्र सदनामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीतासह राज्यगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलन  झाले.

या कार्यकमास महाराष्ट्र सदनच्या सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार,  सार्वजनिक  बांधकाम विभागाचे अभियंता किरण चौधरी, श्री. गंगवार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर, लेखा अधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सारिका शेलार, प्रियंका नागे,  सुरक्षा सहाय्यक अधिकारी अनिल चोरगे  यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र सदनात निवासास असणारे अभ्यागत तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयाचे अधिकारी – कर्मचारी ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित होते.

0000