मुंबई, दि. १५ : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांच्या हस्ते अवयव दात्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी शिवनंदा लंगडापूरे, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, उपजिल्हाधिकारी (अति./निष्का.) प्रशांत पानवेकर, उपजिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्रीमती गोयल म्हणाल्या की, लाखो क्रांतिकारकाच्या बलिदानातून आणि अथक प्रयत्नातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. पण ही जाणिव केवळ उत्सवापूर्ती मर्यादित न राहता आपल्या कर्तव्यात व आपल्याला मिळालेल्या जबाबदाऱ्यामध्ये प्रतिबिंबित व्हायला हवी. मुंबई शहर जिल्ह्याने गेल्या काही वर्षात अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. विविधतेतून एकता ही मुंबई शहराची ओळख आहे. जिल्हा प्रशासनाने विकासात्मक बाबींमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे, असे सांगून त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
00000