मुंबई, दि. १४ :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. जुलै-२०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १३,१८० तिकिटांना ५४ लाख ६० हजार ९५० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ६२,६०९ तिकीटांना रू. २ कोटी २४ लाख १ हजार ४०० ची बक्षिसे जाहीर झाली आहेत, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

माहे जुलै-२०२५ मध्ये १५ जुलै, २०२५ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, १६ जुलै, २०२५ रोजी महाराष्ट्र गौरव, २२ जुलै,२०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी आषाढी विशेष, २६ जुलै, २०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, २९ जुलै, २०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती दुपारी ४.०० वाजता काढण्यात आल्या आहेत.

या लॉटरी तिकिटांना जाहीर झालेले बक्षीस पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी आषाढी विशेष तिकीट क्रमांक GS ०४ – ०७५७ या श्री गुरुदेवदत्त लॉटरी एजन्सी, पुणे यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे.

महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम ८ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे एकूण आठ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम दहा हजारावरील वरील बक्षिसांची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. दहा हजाराच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

किरण वाघ/विसंअ/