नवी दिल्ली, ३ : स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी, ‘परदेशी नव्हे, स्वराज्य हवे’ या विचारांचा पुरस्कार करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ सहायक कक्ष अधिकारी सारिका शेलार यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याचा आणि सातारा प्रजासत्ताक स्थापन करण्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा परिचय उपस्थितांना करून दिला. या कार्यक्रमास महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००