मुंबई, दि. ०१ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, चेंबूर येथील चिरागनगर येथे उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्यास राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त रविकिरण पाटील, आयोगाचे वरिष्ठ लिपीक शेख अय्युब, शरद कांबळे, भालचंद्र शिरसाट, राहूल कांबळे, शंकर कांबळे, योजना ठोकळे, प्रकाश कांबळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ॲड.मेश्राम म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. रशियामधील विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्याचे अध्ययन केले जाते तसेच मॉस्को येथे त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे, ही बाब संपूर्ण भारतासाठी अभिमानाची आहे.
०००
शैलजा पाटील/विसंअ