मुंबई, दि. ३१ : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घोषित केले आहे.
राज्यामधील राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ होती. राज्यातील अनेक कलाकार व कलाकार संघटनांनी ही मुदत वाढवावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्याकडे केली होती. त्यांच्या विनंतीनुसार या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी घोषणा मंत्री ॲड.शेलार यांनी केली आहे. या संदर्भात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देशही दिले आहेत.
००००
संजय ओरके/विसंअ