मुंबई,दि.३० : मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मानवी कर्तव्य समजून सेवाभावाने या केंद्रात उपचार करावेत. समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत कशी देता येईल, याबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
गिरगाव परिसरातील चिराबाजार येतील ‘जीवनस्पर्श’ या नावाने आधुनिक व पारंपरिक उपचारांचा संगम असलेल्या संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मानसी नागरेंकर, डॉ.सुरेश नागरेंकर, डॉ. अमिता नागरेंकर उपस्थित होते.
कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये. अशा रुग्णांसाठी आवश्यक ठिकाणी मी स्वतः मदतीसाठी पुढे येईन,” हे उपचार केंद्र व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता श्रद्धेचे, समतेचे आणि माणुसकीचे मंदिर असावे असे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
डॉ. मानसी सुरेश नागरेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथी, फिजिओथेरपी, पंचकर्म, अॅक्यूपंक्चर, सुजोक, न्यूट्रिशन थेरपी, योग व नैसर्गिक उपचार यांचा प्रभावी संगम या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
0000
काशीबाई थोरात/ वि.सं.अ/