मुंबई, दि. ३० : राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जोपासणारा उल्लेखनीय उपक्रम राबवित मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फलक, बॅनर, पुष्पगुच्छ यावर खर्च न करता त्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ/