मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची बहिरम कुऱ्हा येथे भेट

अमरावती, दि. 25 (जिमाका) : मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज बहिरम कुऱ्हा येथील आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ येथे भेट दिली. वारकरी ज्ञानपीठाच्या वतीने त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मंत्री श्री. पाटील यांनी संस्थानातील विठ्ठल – रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000