मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी १७ जुलै २०२५ रोजी वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन नामांकने मागवण्यात आली होती. तथापि दि.०२.०१.२०२५ रोजीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत, त्यांनी पुनःश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून कार्यालयीन कामकाजाच्या सात दिवसांच्या आत विहित नमुन्यात नामांकने सादर करण्यात यावीत, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना अर्जुन गुंडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी १७ जुलै २०२५ रोजी वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यातील बाबी पुढीलप्रमाणे;
बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम २००५ च्या कलम १७ व १८ मधील तरतुदीनुसार व बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग नियम, २००६ मधील दि.२४/०३/२०१४ व दि.०६/०५/२०१४ च्या दुरुस्तीमध्ये नमूद निकषांचा समावेश करुन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी राज्यातून नामांकने दिनांक १७.०७.२०२५ रोजीच्या जाहिरातीनुसार मागविण्यात आलेली आहेत. तथापि, सदर विषयाच्या अनुषंगाने प्रसिध्द जाहिरातीमधील पहिल्या परिच्छेदामध्ये सात दिवस आणि अंतिम परिच्छेदामध्ये १५ दिवसाच्या आत नामांकने सादर करणे बाबत नमूद करण्यात आलेले आहे.
त्या ऐवजी खालीलप्रमाणे वाचावे
दि.०२.०१.२०२५ रोजीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने ज्यांनी यापुर्वी अर्ज केलेले आहेत, त्यांनी पुनःश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून कार्यालयीन कामकाजाच्या सात दिवसांचे आत विहित नमुन्यात आयुक्त, महिला व बाल विकास, २८ राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१ यांचेकडे नामांकने सादर करण्यात यावीत. असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना अर्जुन गुंडे यांनी जाहीर निवेदनाद्वारे केले आहे.
००००