राज्य शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा स्पर्धेतील यशस्वी कार्यालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम दुसरा टप्पा अंतर्गत स्पर्धेतून निवड झालेल्या जिल्ह्यातील पाच जिल्हास्तरीय व १५ तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे तहसिलदार सर्वसाधारण लीना खरात, स्पर्धेत यशस्वी कार्यालयांचे कार्यालय प्रमुख आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आला.

या कार्यालयांना प्रशस्तीपत्र प्रदान

जिल्हास्तरीय कार्यालय – जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, वरीष्ठ भू-वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी, वस्तु व सेवा कर कार्यालय, उप प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (सर्व कार्यालय, सांगली)

तालुकास्तरीय कार्यालय – उपविभागीय अधिकारी मिरज, तहसिल कार्यालय, मिरज, उपअधिक्षक भूमी अभिलेख, वाळावा, पंचायत समिती शिराळा, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिराळा, बालसंरक्षण अधिकारी, जत, सहायक पशुसंवर्धन आयुक्त, तालुका लघु, पशु सर्व चिकित्सालय, इस्लामपूर, नगरपरिषद विटा, उप अभियंता (जलसंपदा), उपविभाग क्रमांक 11 विटा, उपअभियंता जलसंपदा, वारणा पाटबंधारे उपविभाग, कोडोली तालुका शिराळा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी जत, ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहाकाळ, ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय, भिवघाट, गट शिक्षण अधिकारी कडेगाव

00000