तारळे प्रकल्पग्रस्तांचे शेरे पंधरा दिवसात उठवावेत – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.२१ : तारळे प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील शेरे उठविण्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शेरे उठविण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड,पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
तारळे प्रकल्पांतर्गत लाभ क्षेत्रात 20 गावे येतात. यातील 11 हजार 922 खातेधारकांच्या जमिनीवरील शेरे उठविले असून 4 हजार 951 खातेदारांच्या जमिनीवरील शेरे शिल्लक आहेत. हे शेरे येत्या 15 दिवसात उठवावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
0000