मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये (MPSC) डॉ. दिलिप भुजबळ- पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष श्री. रजनीश सेठ यांनी श्री. भुजबळ- पाटील यांना आयोगाच्या बेलापूर येथील मुख्यालयात शपथ दिली.
या वेळी आयोगाचे सदस्य अभय वाघ, सतिश देशपांडे, राजीव निवतकर, महेंद्र वारभुवन यांच्यासह आयोगाचे सहसचिव अवताडे उपस्थित होते.
०००००
राजू धोत्रे/विसंअ