मुंबई, दि. ४ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि यांचे परिवारसह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे दुपारी १.०० वाजता आगमन झाले.
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर- पाटणकर, पोलीस आयुक्त, मुंबई देवेन भारती, विधी व न्याय विभाग प्रधान सचिव सुवर्णा केओले तसेच मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते.
०००