नंदुरबार, दिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शासकीय यंत्रणांनी विकासकामे नियम आणि निकषाप्रमाणे मुदतीत पूर्ण करावीत; कामे वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच जिल्हा वार्षिक योजनेत कोणतेही प्रस्ताव सादर करताना तेथील स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन व त्यांची शिफारस घेऊनच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत.
आज नियोजन भवनात आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. यावेळी विधानपरिषदचे सदस्य चंद्रकांत रघुवंशी, किशोर दराडे, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, शिरीषकुमार नाईक, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी, डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अनय नावंदर जिल्हा नियोजन अधिकारी, नंदुरबार शशांक काळे, उपस्थित होते. तसेच या बैठकीत झालेल्या चर्चेत सर्वांनी सहभाग घेतला.
सन 2024-25 या संदर्भ वर्षातील जिल्हा वार्षिक योजनांचा 31 मार्च, 2025 अखेरपर्यत वार्षिक योजनांच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा सन 2024-25
दिनांक 31 मार्च, 2025 अखेर झालेला खर्च (रुपये लाखात)
क्र. | योजना | मंजूर नियतव्यय | प्राप्त तरतुद | वितरीत तरतुद | झालेला खर्च | खर्चाची टक्केवारी |
1. | सर्वसाधारण योजना | 19200.00 | 19200.00 | 19200.00 | 19087.79 | 99.42% |
2. | आदिवासीउपयोजना(TSP/OTSP) | 38925.00 | 38925.00 | 38925.00 | 38611.00 | 99.20% |
3. | अनुसुचित जाती उपयोजना | 1400.00 | 1400.00 | 1399.50 | 1399.50 | 99.96% |
एकूण नंदुरबार जिल्हा | 59525.00 | 59525.00 | 59524.50 | 59098.29 | 99.28% |
बैठकीत सन 2024-25 मधील कामांचा आढावा घेण्यात आला.
- पालकमंत्री यांनी निर्देश दिल्यानुसार शेतकऱ्यांसाठी मोफत माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु.
- अन्न परीक्षण प्रयोगशाळा ( food testing lab) ला देखील मंजुरी.
- कृषी कार्यालय सर्व प्रयोगशाळांसाठी सुसज्ज इमारत उभारणार.
- टंचाईग्रस्त वाडी पाड्यावर पाणीपुरवठा करण्यासाठी 123 गावांना टँकर मिळणार
- स्मशानभूमी नसलेल्या 5 गावांना स्मशानभूमी कामांना मंजुरी.
- 3 ग्रामपंचायत कार्यालय इमारत व बँक साठी निधी मंजूर ग्रामपंचायत कार्यालयात बँकेची सुविधा होणार सुरु.
- बँकेची सोयीसुविधा नसलेल्या ठिकाणी बचत गटातील बँक सखी देणार सेवा .
- सरकारी कार्यालयामध्ये टप्याटप्याने अभ्यांगतासाठी पाणी व स्वच्छतागृहाची सोयीसुविधा .
- रुपये 1 कोटी खर्चाच्या फिश क्लस्टरला मंजुरी
- अंगणवाडी मध्ये आहार शिजवण्यासाठी साहित्य वाटपास मंजुरी
- प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र होणार प्रमाणित आवश्यक साहित्यासाठी आरोग्य विभागास निधी मंजुर
- लहान मुलांसाठी रुपये 3 कोटी निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे पीआयसीयु (PICU) कार्यान्वित होणार.
- नंदुरबार शहरातील चार ठिकाणी सिग्नल साठी रुपये 50 लक्ष मंजूर
- पोलीस दलाच्या वाहनासाठी रुपये 1.50 कोटी उपलब्ध
- पोलीस अधीक्षक कार्यालय : सौर विद्युत व्यवस्थासाठी निधी मंजूर.
वरील मंजुर कामांच्या बाबतीत जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले असुन पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी नियोजन विभागाचे अभिनंदन केले.
जिल्हा वार्षिक योजना मंजुर नियतव्यय सन 2025-26 (रुपये लाखात)
क्र. | योजना | मंजूर नियतव्यय |
1. | सर्वसाधारण योजना | 21300.00 |
2. | आदिवासीउपयोजना(TSP/OTSP) | 42954.15 |
3. | अनुसुचित जाती उपयोजना | 1400.00 |
एकूण नंदुरबार जिल्हा | 65654.15 |
बैठकीपूर्वी झाला गुणगौरव सोहळा..
यामध्ये सर्व सनसनाटी व कठीण गुन्ह्याचा यशस्वीपणे शोध लावून तपास करणे कामी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला. तसेच माननीय मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसांचा कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कार्यालयांना बक्षीस जाहीर झाले अशा कार्यालयांचा सत्कार करण्यात आला यामध्ये उपविभागीय कृषि अधिकारी यांचे कार्यालय (सी. के. ठाकरे), तालुका कृषी अधिकारी धडगांव (आर. एम. शिंदे) , सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार (नितीन वसावे), तालुका वैद्यकीय अधिकारी धडगाव (कांतीलाल पावरा), कनिष्ठ अभियंता जलसंधारण विभाग नंदुरबार (निलेश पाटील), मुख्याधिकारी नगरपालिका नंदुरबार (राहुल वाघ), व उपवनसंरक्षक कार्यालय,अक्कलकुवा.
तसेच बिहार येथे खेळण्यात आलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने 56 गोल्ड, 45 सिल्वर, आणि 48 ब्राँझ असे एकूण 149 पदके मिळवलीत. या स्पर्धेत एस. ए. मिशन हायस्कूलचे खेळाडू सौरभ राजपूत याच्या निर्णायक गोलने महाराष्ट्र मुलांच्या रग्बी संघाला खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये ब्राँझ पदक मिळवून दिल्याबद्दल त्यांचे तसेच त्यांच्या सोबत असलेला खेळाडू प्रणव गावित व त्यांचे मार्गदर्शक खुशाल शर्मा यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते शाल व पदक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभाग नंदुरबार यांना सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत हुडको यांच्याकडून प्राप्त सहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकोटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
000000