बीड दि. 9 ( जिमाका ) : -पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायचं काम भारत करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेला हा घुसके मारेंगे वाला भारत आहे.
आमच्या लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम या दहशतवाद्यांनी केलं त्यासाठी ऑपरेशन सिंदूर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले त्याचे मी स्वागत करतो. पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायचं काम आमचे जवान करत आहेत या दरम्यान महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले त्यांना मी आदरांजली वाहतो असे म्हणत, केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी बैठक झाल्याचीदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बीडच्या तारकेश्वर गड येथे संत नारायण बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश धस, यांची प्रमुख उपस्थिती होती.. गडाच्या विकासासाठी आवश्यक ती मदत आपण करणार असल्याचा शब्द देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी गडाचे महंत आदिनाथ महाराज यांना दिला..
कार्यक्रमासाठी गडावरील हेलिपॅड वर त्यांचे आगमन झाले त्यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन तसेच पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.