सातारा दि. 9 : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.
यावेळी मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, दिलीप वळसे पाटील, रोहित पवार, चेतन तुपे, बाबासाहेब देशमुख, आशितोष काळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार सुनील भुसारा, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक अनिल पाटील, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, ॲङ राम काणगे आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिवादनानंतर रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखा, यशवंतराव चव्हाण आर्दश शिक्षक पुरस्कार विजेते, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कर्मवीर पारितोषिक विजेत्या पुढील शाखांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या मध्य विभाग – अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा, दक्षिण विभाग- महात्मा गांधी विद्यालय, कडेगाव जि.सांगली (कर्मवीर पारितोषिक व व समाजभूषण स्व. बाळकृष्ण रावजी मोहिते पारितोषिक),उत्तर विभाग-श्री. कोळाईदेवी विद्यालय, कोळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, पश्चिम विभाग-चंद्रभागा बाबुराव तुपे कन्या विद्यालय, हडपसर, ता. हवेली, जि. पुणे
५०१ ते १००० पर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या मध्य विभाग- इंग्लिश स्कूल, वडूथ, ता. जि.सातारा, दक्षिण विभाग- राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालय, ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली (कर्मवीर पारितोषिक व समाजभूषण स्व. बाळकृष्ण रावजी मोहिते पारितोषिक), उत्तर विभाग- महात्मा फुले विद्यालय, भाळवणी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर,पश्चिम विभाग- नरसिंह विद्यालय, राजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे
५०० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या मध्य विभाग- चंद्रकांत बाबुराव जाधव विद्यालय, शेरेवाडी, ता. जि. सातारा, दक्षिण विभाग- श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय, पालशेतकर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी (कर्मवीर पारितोषिक व समाजभूषण स्व. बाळकृष्ण रावजी मोहिते पारितोषिक),उत्तर विभाग- लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय, अहिल्यानगर, ता. जि. अहिल्यानगर, पश्चिम विभाग- श्री. भैरवनाथ विद्यालय, अवसरी खुर्द, सा. आवेगाव, जि. पुणे
रायगड विभागामध्ये ८०१ पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाखा- कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व शकुन्धनी परेरा ज्युनि. कॉलेज, जूचंद्र, ता. वसई, जि. पालघर, ८०० पर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या शाखा – सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय, उलया, ता. पनवेल, जि.रायगड यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
इंग्लिश मीडियम विभाग- इंग्लिश मेडियम विभागाच्या इ.१० वी पर्यंत वर्ग असलेल्या पाच विभागातून एका शाखेची निवड -रयत इंग्लिश मेडियम स्कूल, कराड, ता. कराड, जि. सातारा, प्राथमिक विभाग-प्राथमिक विभागाच्या मराठी माध्यम वर्ग असलेल्या पाच विभागातून एका शाखेची निवड- स्व. एस. एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदीर, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर, आश्रमशाळा विभाग- महर्षि विठ्ठल रामजी शिंदे आश्रमशाळा, मोखाडा, जि.पालघर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार -पुरस्काराचे स्वरूप रु. ५१,०००/- (रु. एकावन्न हजार फक्त), प्रमाणपत्र, मोमेटो, शाल व बुके, महाविद्यालय स्तर- प्रा.डॉ. विजय मारुती कुंभार, प्राध्यापक, धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा, विद्यालय स्तर- श्री. प्रशांत बबनराव खंडागळे, पर्यवेक्षक,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, सारोळा कासार, ता. जि. अहिल्यानगर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सन २०२२ ते २०२५ या शैक्षणिक वर्षात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा गौरव समारंभ. सत्काराचे स्वरूप : रू.२,००,०००/- (रु. दोन लाख फक्त), चांदीचे नाणे व गुलाब पुष्प शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू – ओजस प्रविण देवळे (धनुर्विद्या), संस्कृती विकास मोरे पैरा (बुद्धिबळ), पृथ्वीराज बाजीराव पाटील (रम्बी)- छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा, अन्नपुर्णा सुनिल कांबळे (पॅरा जलतरण), अफ्रिद मुख्तार आतार (पॅरा जलतरण)- राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू – साहिल रविंद्र गुर्जर (आईस स्टोक), साहिल राजेश जाधव (धनुर्विद्या)- यशवंतराव चव्हाण इन्स्टि ऑफ सायन्स,सातारा, पार्थ राकेश माने (रा. शूटींग)- महात्मा फुले ए.एस.सी. कॉलेज, पनवेल, अनुष्का दतात्रय कुंभार (अॅथलेटिक्स)- सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय,सातारा, साक्षी नितीन जामले (रम्बी), मथुरा शैलेश धामणगावकर (धनुर्विद्या)- छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कर्मवीर पारितोषिक सत्कार सत्काराचे स्वरुप – प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प. महाविद्यालय विभाग -‘अ’ १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाखा -सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड, ता. कराड, जि. सातारा. गट ब – १५०० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाखा – डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर, ता. पलुस, जि. सांगली यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.