मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजवंदन करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी आचल गोयल, अपर जिल्हाधिकारी रवी कडकधोंड, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शाम सुरवसे उपस्थित होते.
यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते कर्तव्यावर कार्यरत असतांना असामान्य कामगिरीबद्दल मुंबई शहर व जिल्ह्यातील सहा रक्षकांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
00000