छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका)- ‘घर घर संविधान’ अभियानाचा उपक्रम म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेच्य कोनशिलेचे अनावरण आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर प्रवेशद्वारा जवळ ही उद्देशिकेची कोनशिला स्थापित करण्यात आली आहे. विधान परिषद सदस्य आ.संजय केनेकर, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांची यावेळी उपस्थिती होती.
०००००