सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 779

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात २७ उमेदवार रिंगणात

मुंबई उपनगर, दि. 6 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली आहे.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नाव, पक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : अयुब अमीन हुनगुंद (बहुजन समाज पार्टी, हत्ती), ॲड. उज्वल निकम (भारतीय जनता पार्टी, कमळ), गायकवाड वर्षा एकनाथ (इंडियन नॅशनल काँग्रेस, हात), ॲन्सन थॉमस (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर, द्राक्षे), कुर्बान शहादत हुसेन (राष्ट्रीय ओलमा कौन्सिल, बॅट), खान अब्बास अहमद (बहुजन महा पार्टी, शिट्टी), डॉ. (ॲड.) यशवंत रामभाऊ कसबे (भारतीय जनविकास आघाडी, कोट), रमजान अली चौधरी (ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन, पंतग), शौकत अब्दुल रफीक खान (इन्सानियत पार्टी, ऑटो रिक्षा), संतोष गणपत अंबुलगे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), हयात्तुल्लाह अब्दुल्लाह शेख (अखिल भारतीय मुस्लिम लीग सेक्युलर, बॅटरी टॉर्च), हर्षदा बाबूराव जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी, रोड रोलर), अब्दुल ताहीर ॲडव्होकेट (बबलू रजनीकांत, अपक्ष, काडेपेटी), ॲड. असिफ अली सिद्दीकी (अपक्ष, जहाज), ॲड. उत्तमकुमार नकुल सजनी साहू (अपक्ष, बासरी), इजाज मोहम्मद सफी खान (अपक्ष, डंबेल्स), डॉ. गफ्फार इब्राहिम सय्यद (अपक्ष, स्टेथोस्कोप), नजमाखतून मोहम्मद जफर खान (अपक्ष, कॅमेरा), नरेंद्र मिश्रा (अपक्ष, सफरचंद), ॲड. फिरोज शेख (अपक्ष, स्पॅनर), मुझाफर अली शेख (अपक्ष, चालण्याची काठी), मुश्ताक हैदर शेख (अपक्ष, हिरा), युनूसअली रशीद मुल्ला (अपक्ष, दूरध्वनी), रमा अरुण साबळे (अपक्ष, नागरिक), राजेश मोहन लोखंडे (अपक्ष, खाट), शांताराम स. दिघे (अपक्ष, प्रेशर कुकर), संदीप (भाऊ) रामचंद्र जाधव (अपक्ष, पेनाची निब, सात किरणांसह).

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई उपनगर दि. 6 – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नाव, पक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : नंदेश विठ्ठल उमप (पक्ष – बहुजन समाज पार्टी, चिन्ह – हत्ती) , मिहिर चंद्रकांत कोटेचा (भारतीय जनता पार्टी, कमळ), संजय दिना पाटील (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मशाल), संजय ब. पाटील (नॅशनल पीपल्स पार्टी, पुस्तक), दत्तात्रय अर्जुन उतेकर (भारतीय जवान किसान पार्टी, भेटवस्तू), दौलत कादर खान (वंचित बहुजन आघाडी, एअर कंडिशनर), प्रो. डॉ. प्रशांत गंगावणे (देश जनहित पार्टी, प्रेशर कुकर), भवानी चौधरी (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी, शिट्टी), भूपिंदर सिंह सैनी (विरो के विर इंडियन पार्टी, हिरा), मोहम्मद अरमान मोहम्मद वसि खान (राष्ट्रीय जनहित संघर्ष पार्टी, कोट), कॉम्रेड सुरेंद्र सिबाग (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, सिंह), संजय सावजी देशपांडे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, कॅरम बोर्ड), संजू मारूती पवार (महाराष्ट्र विकास आघाडी, गॅस सिलेंडर), प्रेम रमापती गुप्ता (अपक्ष, खाट), बनसोडे दिलीप (अपक्ष, कपाट), मोहम्मद अहमद शेख (अपक्ष, अंगठी), विद्या नाईक (अपक्ष, खिडकी), शहाजी नानाजी थोरात (अपक्ष, काडेपेटी), डॉ.सुषमा मौर्य (अपक्ष, बॅटरी चार्ज), संजय पाटील (अपक्ष, सफरचंद)  असे आहेत.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात

मुंबई उपनगर, दि. 6 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात माघारीअंती 21 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नाव, पक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : अमोल गजानन कीर्तिकर (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मशाल), रवींद्र दत्ताराम वायकर (शिवसेना, धनुष्यबाण), राजेश रामकिसन मल्लाह (बहुजन समाज पक्ष, हत्ती), अरोरा सुरिंदर मोहन (भारत जनआधार पार्टी, कारंजा), परमेश्वर अशोक रणशूर (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), बाला वेंकटेश विनायक नाडर (आपकी अपनी पार्टी (पीपल्स) बॅटरी टॉर्च), भरत खिमजी शाह (हिंदू समाज पार्टी, ऑटो रिक्षा), मनोज श्रावण नायक (राइट टू रिकॉल पार्टी, प्रेशर कुकर), ॲड. मितेश वर्ष्णेय (भीमसेना, बासरी), सारिका डब्राल (इंडिया ग्रीन्स पार्टी, सफरचंद), हरिशंकर यादव (समाजविकास क्रांती पार्टी, विजेचा खांब), ॲडव्होकेट कपिल कांतिलाल सोनी (अपक्ष, सीसीटीव्ही कॅमेरा), गजानन तुकाराम सोनकांबळे (अपक्ष, पाटी), रोहन साठोणे (अपक्ष, माईक), ॲड. लता पांडुरंग शिंदे (अपक्ष, टंकलेखन यंत्र), समीर मोरे (अपक्ष, भालाफेक), सुनील भिमा चव्हाण (अपक्ष, जहाज), सुषमा दयानंद मेहता (अपक्ष, खाट), ॲड. संजीवकुमार अप्पाराव कलकोरी (अपक्ष, शिट्टी), संतोष माणिक रायबान (अपक्ष, ट्रक), ह्दा धनंजय शिंदे (अपक्ष, पेनाची निब सात किरणांसह).

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात

मुंबई उपनगर, दि. 6 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई उत्तर मतदारसंघात 19 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी दिली.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नाव, पक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : पीयूष गोयल (भारतीय जनता पार्टी, कमळ), भूषण पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस, हात), रईस डॉक्टर (बहुजन समाज पार्टी, हत्ती), अलिक सुंदर मेश्राम (भारतीय मूलनिवासी आजाद पार्टी, हंडी), कमलेश डाह्याभाई व्यास (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी, शिट्टी), कॉम्रेड जयराम विश्वकर्मा (सोशॅलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट, बॅटरी टॉर्च), जयेंद्र वसंत सुर्वे (भारतीय जवान किसान पार्टी, भेटवस्तू), दीपाली भवरसिंग शेखावत (महाराष्ट्र विकास आघाडी, रोड रोलर), बिपिन बच्चूभाई शाह (हिंदू समाज पार्टी, ऑटो रिक्षा), रवी बाबू गवळी (समता पार्टी, नागरिक), सय्यद जुल्फिकार आलम (बहुजन महा पार्टी, दूरदर्शन), ॲड. सोनल दिवाकर गोंडाणे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), ॲड. कपिल कां. सोनी (अपक्ष, सीसीटीव्ही कॅमेरा), गुरुदास रामदास खैरनार (अपक्ष, शिवणयंत्र), दीप्ती अशोक वालावलकर (अपक्ष, ऊस शेतकरी), पांडे धर्मेंद्र राममुरत (अपक्ष, बॅट), मुन्नालाल गजराज प्रजापती (अपक्ष, खाट), लक्ष्मण यल्लपा कुराडे (अपक्ष, प्रेशर कुकर), संजय मफतलाल मोरखिया (अपक्ष, कॅमेरा).

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे, दि. 06 जिमाका – 23, भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत  निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व  उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप केल्यावर सर्व उमेदवारांची स्थायी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. या बैठकीला केंद्रीय खर्च विषयक निरीक्षक चित्तरंजन माझी, केंद्रीय सर्वसाधारण  निवडणूक राजनविर सिंग कपूर  उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी नमूद केले की,  निवडणुकीचे कामकाज हे एकदम चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरता सर्व उमेदवारांचे सहकार्य अपेक्षित आहे. उमेदवाराने प्रचाराच्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेणे कामी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे आवश्यक आहे, कोणत्याही प्रकारची  परवानगी न घेता प्रचार केल्यास नियमानुसार कारवाई करणार असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला.

या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी  संजय जाधव यांनी सर्व प्रमुख राजकीय पक्षीय प्रतिनिधी, उमेदवार  यांना सूचना केल्या की,  निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार  उमेदवार व राजकीय पक्षाने तीन वेळा प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडिया मधून उमेदवाराची माहितीचे जाहीर प्रकटन करणे आवश्यक आहे. निवडणुकीकरीता उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडावे व त्या खात्यातून सर्व निवडणूक खर्च करावा. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा 95 लाख आहे. उमेदवाराने केलेला सर्व खर्च केंद्रीय निवडणूक निरीक्षक तपासतील. उमेदवाराचा प्रचार सभा, रॅली याचे सर्वांचे व्हिडीओ शुटींग करण्यात येणार आहे. उमेदवाराला प्रचारासाठी लागणारी सर्व प्रकारची वाहने वापरणेकामी  पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहनाचा खर्च हा स्वतंत्रपणे दाखवणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यासाठी निवडणूक निर्णय़ अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच सर्व सहाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यासाठी किमान तीन दिवस आगोदर अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या निकषावर सर्व  परवानग्या देण्यात येतील. उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी ईव्हीएम मशीन आणतेवेळी, स्ट्राँग रूम मध्ये ठेवताना उपस्थित राहू शकतात.  कोणत्याही प्रकारचे प्रचार साहित्य प्रसिध्द करणेकामी निवडणूक निर्णय अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच समाज माध्यम (सोशल मिडीया)  व इलेक्ट्रानिक मिडीयावर प्रचार करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. पूर्व परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचे प्रचाराचे साहित्य प्रसिध्द करण्यात येऊ नये, तसेच कोणतीही परवानगी नसताना कोणतेही  वाहन वापरता येणार नाही किंवा तसेच कोणताही प्रचार करता येणार जर नियमांचे व कायद्यांचे उल्लघंन झाल्यास त्या उमेदवार व पक्षावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.

केंद्रीय खर्च विषयक निरीक्षक चित्तरंजन माझी यांनी उमेदवाराने सर्व खर्च व्यवस्थित ठेवणे अपेक्षित असून सर्व उमेदवार यांच्या खर्चाची प्रथम  तपासणी 9 मे, द्वितीय तपासणी 14 मे आणि  तृतीय तपासणी 18 मे रोजी होणार असल्याची माहिती चित्तरंजन माझी यांनी या बैठकीत दिली. तर सर्वसाधारण केंद्रीय निवडणूक निरीक्षक राजनवीर सिंग कपूर यांनी सांगितले की, निवडणुकीच्या बाबतीत जर  तक्रार  करून तक्रारीची दखल घेत नाही,  असे निदर्शनास आल्यावर केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्याशी आपण मेलवर तक्रार  शकता. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या प्रकारे पार पाडणे, ही आपणा सर्वांची आता जबाबदारी आहे असेही देखील त्यांनी नमूद केले. मुख्य निवडणूक कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे त्याचा नंबर असा आहे 1800 233 1114 या नंबरवर तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मेलवर आपण तक्रार नोंदवू शकता अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.

0000000

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

मुंबई, दि. ६ : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कटकधोंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, सर्वसाधारण निरीक्षक राजीव रंजन, निवडणूक पोलिस निरीक्षक मुकेश सिंह, अपर पोलिस आयुक्त अभिनव देशमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, ऋषीकेश वाघ यांच्यासह नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. कटकधोंड म्हणाले, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. सभा, पदयात्रा, रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी आणि त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी. उमेदवारांनी त्यांच्या दैनंदिन खर्चाचा हिशेब ठेवावा. यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे श्री. कटकधोंड यांनी निरसन केले. ईव्हीएमबाबत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना १२ ते १४ मे दरम्यान निरीक्षकांसमोर प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. त्यामुळे निवडणुका शांततेत व सुरळीतपणे होण्यासाठी सहकार्य करावे, असेही श्री. कटकधोंड यांनी सांगितले.

दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था करावी. तसेच प्राथमिक सुविधाही पुरवाव्यात, अशा सूचना यावेळी उपस्थितांनी केल्या. मुंबई शहर प्रशासनाकडून याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे श्री. कटकधोंड यांनी यावेळी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर, दिनांक 6:- जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे. या अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याच अनुषंगाने करमाळा तालुक्यातील गोयेगाव येथे निवडणूक विभागाच्या वतीने आदर्श मतदान केंद्र केलेले आहे. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना  फूट मसाजरची सुविधा गोयेगाव ग्रामपंचायतने दिलेली आहे, अशी माहिती करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे.

गोयेगाव ग्रामपंचायत ने आदर्श मतदान केंद्राच्या बाहेर हे फूट मसाजर मतदारासाठी ठेवलेले आहे. त्यामुळे येथे मतदान करण्यासाठी पायी चालून येणाऱ्या मतदारांना तसेच उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन डीहायड्रेशन झाल्यानंतर मतदारांना पायांचा त्रास झाल्यास तात्काळ पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर हे अद्यावत यंत्र येथे ठेवण्यात आलेले आहे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून ही सुविधा मतदारासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. मतदारांसाठी केलेला हा एक अनोखा उपक्रम असल्याने या भागातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केल्यानंतर खूप मसाजर मशिन च्या माध्यमातून पाय दाबून घेण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद, माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, एएमएफ चे नोडल अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती करमाळा व ग्राम पंचायत गोयेगाव यांनी मतदारांसाठी फूट मसाजर हा अनोखा उपक्रम केलेला आहे.

वस्तीवरून गावातून चालत येणाऱ्या मतदारांना डीहायड्रेशन चा होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागामार्फत ORS आणि मेडिकल किट ठेवण्यात आले आहे. तसेच या मतदान केंद्रावर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्यात आलेला आहे. मतदारांना उन्हापासून संरक्षण म्हणून मंडप टाकण्यात आला आहे. शाळेतील अमृत रसोई मध्ये फ्रीज उपलब्ध आहे तेथे थंड पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेले आहे. मतदारांना मतदानाच्या शिक्षणासाठी व्हरांड्यात टीव्ही लावण्यात आलेला आहे. या मतदान केंद्रावर 100% मतदान होण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.

0000000

 

निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे झाले आगमन; पारंपरिक पद्धतीने स्वागत

रायगड दि. 6 :- भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आयइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधींचे मंडळ निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्याकरीता रायगड जिल्ह्यातील 32 रायगड लोकसभा मतदार संघात आले आहे. या प्रतिनिधी मंडळाने आज अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी आणि टीमच्या साहित्य वाटप, वाहतूक आणि स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्षाची पाहणी केली.

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था (EMBs) यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम (IEVP) कार्यक्रम आयोजित केला आहे. या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे रायगड जिल्ह्यात मांडवा जेट्टी येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी भारतीय संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने औक्षण, फेटा आणि हार घालून स्वागत केले. या विदेशी प्रतिनिधी मंडळामध्ये बांग्लादेशचे दोन प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी,जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी) कझाकिस्तान देशाचे दोन प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन (केंद्रीय निवडणूक आयोग कझाकिस्तान), श्रीलंका देशाच्या सिलया हिलक्का पासिलीना (संचालक श्रीलंका) झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) हे आहेत.

या प्रतिनिधींनी जे.एस.एम. महाविद्यालयात सुरू असलेल्या मतदान केंद्रस्तरीय पथकाची साहित्य वाटपाची तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जाण्यासाठी केलेल्या वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.  याबरोबरच मतदान यंत्राविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना एकूण मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ.ज्योस्ना पडियार यांनी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट याविषयी प्रत्यक्ष हाताळणी करून दाखविली. या मंडळाने नेहुली येथील स्ट्राँगरूमची पाहणी केली. मतदानानंतर स्ट्राँगरूम मध्ये जमा करण्यात येणाऱ्या मतदान यंत्राची विधानसभा मतदार संघनिहाय रचना केली जाते त्याची पाहणी करुन त्याविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच मतमोजणी कशा पद्धतीने होते, मतमोजणी केंद्राची रचना, आवश्यक त्या सर्व बाबींची माहिती घेतली.

0000

लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे

            मुंबई, दि. ६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले.

               लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवारांनी पालन करावयाच्या नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी श्री. पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती.

               या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, सर्वसाधारण निरीक्षक गौरी शंकर प्रियदर्शी, निवडणूक पोलीस निरीक्षक मुकेश सिंह, अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात, समन्वय अधिकारी तुषार मठकर, उपसंचालक (वित्त) चित्रलेखा खातू यांच्यासह विविध नोंदणीकृत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मतदारांनी उन्हापासून योग्य ती काळजी घ्यावी. मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून प्रथमोपचार पेटी, वेटिंग रूम व इतर आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. मुंबईत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

               निवडणूक प्रक्रिया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देऊन श्री. पानसरे म्हणाले, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होत आहे. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. प्रचारविषयक नियम, निवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे नियम आदी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

            याप्रसंगी ११ नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांना व अन्य १५ उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे निरसन श्री. पानसरे यांनी यावेळी केले. ईव्हीएमबाबतच्या शंका, रॅन्डमायझेशन कसे होते, याबाबतचे प्रात्यक्षिक निरीक्षकांसमोर उमेदवारांच्या प्रतिनिधींना ८ मे रोजी दाखविले जाणार असल्याचे श्री. पानसरे यांनी सांगितले.

            निवडणूक काळात सोशल मीडिया वापरताना उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी योग्य ती काळजी घ्यावी, डिपफेक व्हिडिओ करणे हा गुन्हा आहे. रॅली काढताना वाहतुकीला अडथळा होईल, अशी कृती करता कामा नये, स्पीकरची परवानगी पोलिसांकडून घ्यावी, ७५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजांवर बंदी असल्याचे अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर यांनी यावेळी सांगितले.

**

शैलजा पाटील/विसंअ/

२५ ठाणे लोकसभा व २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय निरीक्षकांना भेटण्याची तारीख निश्चित

ठाणे, दि. 6 : (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे या निरीक्षकांना भेटण्याची वेळ व तारीख जाहीर करण्यात आले आहे.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून जे.श्यामला राव (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर खर्च निरीक्षक म्हणून श्री. चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) व श्री. राहिल गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक म्हणून कु. इलाक्किया करुणागरन या दाखल झाल्या आहेत.

नागरिकांनी संपर्क करावा….

सर्वसाधारण निरीक्षक श्री. श्यामला राव यांचा संपर्क क्रमांक 8356072099 व 022-20810983  असा असून त्यांचा ई-मेल 25observer@gmail.com  असा आहे. श्री.राव यांना रेमंड गेस्ट हाऊस, जे.के.ग्राम, पाचपाखाडी, ठाणे (प), येथे दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत भेटता येईल.

केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. मीना हे २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील १४८ – ठाणे, १५० – ऐरोली, १५१ बेलापूर या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील. श्री. चंद्र प्रकाश मीना यांचा संपर्क क्रमांक ८३६९०४५८२४ असा असून           ई-मेल expobserver25pc@gmail.com हा आहे.

श्री. गुप्ता हे २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील १४५ मिरा-भाईंदर, १४६ ओवळा-माजिवडा, १४७ कोपरी-माजिवडा या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील. श्री. गुप्ता यांचा संपर्क क्रमांक ८७७९०२६९१४ असा असून exp.observer.pc25@gmail.com  हा त्यांचा ई-मेल आहे. दोन्ही खर्च निरीक्षकांना शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

पोलीस निरीक्षक कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) यांचा संपर्क क्रमांक 8591173368 हा असून  ilakkiyaips12@gmail.com  हा त्यांचा ई-मेल आहे. कु.करुणागरन यांना रेमंड गेस्ट हाऊस, जे.के.ग्राम, पाचपाखाडी, ठाणे (प), येथे दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत भेटता येईल.

 

२३ भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निरीक्षकांना भेटण्याची वेळ व तारीख जाहीर

भारत निवडणूक आयोगाने 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून या तीनही निरीक्षकांना भेटण्याची वेळ व तारीख जाहीर करण्यात आली आहे.

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून श्री. राजनवीर सिंग कपूर (आयएएस), खर्च निरीक्षक म्हणून श्री श्री.चित्तरंजन धंगडा माझी  (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक म्हणून के. जयरामन (आयपीएस) यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे.

खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ

23-भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निरीक्षक श्री.कपूर (आयएएस) यांचा संपर्क क्रमांक 8356074530 व 02522-230200 आणि फॅक्स क्र. 02522-220108 असा असून  genobserverbhiwandi@gmail.com हा त्यांचा ईमेल आहे. श्री.कपूर यांना उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय, ठाणे रोड, गुलजार नगर, भिवंडी, ता.भिवंडी येथे दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत भेटता येईल.

पोलीस निरीक्षक श्री. जयरामन (आयपीएस) यांचा संपर्क क्रमांक 8788484783  असा असून ईमेल पत्ता  23.bhiwandi.plcobs@gmail. com असा आहे. श्री.जयरामन यांना ठिकाण एम.एस.टी.सी.एल. रेस्ट हाऊस, पहिला मजला, पडघा, ता.भिवंडी येथे दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत भेटता येईल.

केंद्रीय खर्च निरीक्षक श्री.माझी (आयआरएस) यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, उपविभागीय कार्यालय, भिवंडी येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. श्री. माझी (आयआरएस) यांचा मतदारसंघातील संपर्क क्रमांक ८३६९७३६०८२ असा असून bhiwandiexpobs@gmail.com हा त्यांचा ई-मेल आहे.

000000

ताज्या बातम्या

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुखमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. २०: आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने...

कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

0
मुंबई, दि.20 :  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत...

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे...