रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 778

विदेशी प्रतिनिधी सहभागी झाले लोकशाहीच्या उत्सवात

रायगड, दि ०७:–लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाहणीसाठी जिल्ह्यात आगमन झालेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी आज पेण व अलिबाग तालुक्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत निवडणूक मतदान प्रक्रिया जवळून अनुभवली.  विदेशी प्रतिनिधी मंडळातील बांग्लादेशचे 2 प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी , जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी) कझाकिस्तान देशाचे 2 प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन(केंद्रीय निवडणूक आयोग कझाकीस्तान), श्रीलंका देशाच्या सिलया हिलक्का पासिलीना(संचालक श्रीलंका) झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) हे सातही सदस्य आजच्या मतदान पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.

मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी मतदान यंत्राची अंतिम पडताळणी करण्यासाठी होणारे ‘मॉक पोल’ पाहण्यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून सर्व विदेशी प्रतिनिधींचा ताफा वेगवेगळ्या मतदान केंद्रावर पोहचला होता. या मतदान प्रक्रियेच्या शुभारंभाची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने भेट देऊन प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. यावेळी ‘मॉक पोल’ ही प्रक्रिया ईव्हीएम मशिनची विश्वासर्यता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली.

मतदान केंद्रात मतदानासाठी येणाऱ्या मतदारांनी विदेशी पाहुण्यांनी भारतीय पद्धतीने नमस्कार करून दुभाषक यांच्या माध्यमातून संवाद साधला. पारंपारीक पध्दतीने केलेल्या स्वागताचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्राना भेटी देऊन  निवडणूक प्रक्रिया व बाहेरील वातावरण याची बारकाईने माहिती घेतली.

प्रत्येक मतदान केंद्रावर केलेली जय्यत तयारी, दिव्यांगांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी केलीली विशेष व्यवस्था, महिला किंवा तरुणांचे विशेष केंद्र, सेल्फी पॉईंट, फर्स्ट एड किट सारख्या अनेक बाबी प्रतिनिधींना भारावून टाकणाऱ्या होत्या. मतदानासाठी उत्साहाने आलेल्या मतदारांचा उत्साह त्यांनी यावेळी पाहिला. तसेच काही ठिकाणी तयार करण्यात आलेल्या सखी मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, दिव्यांग स्वयंचलीत मतदान केंद्रावर भेट देऊन मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. या सर्व प्रतिनिधीनी आकर्षक पद्धतीने बनविलेल्या सेल्फी पाॅईन्टवर फोटो काढला. सामान्य मतदाराप्रमाणे ते सर्वजण लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी झाले होते.

मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदारांसाठी स्वीप उपक्रम, मतदान केंद्रावर प्राथमिक उपचार, यांची माहिती याबाबत त्यांनी मतदान अधिकारी कर्मचारी, आरोग्य सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.


गेली दोन दिवस भारतीय लोकशाही मधील निवडणूक  कशा पद्धतीने पार पाडली जाते याचे प्रात्यक्षिक त्यांनी पाहिले. निवडणूक यंत्रणाचे कामाप्रती असलेल्या निष्ठा आणि प्रामाणिक पणा याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
०००००

२६- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांची दहिसर विधानसभा निवडणूक कार्यालयाला भेट

मुंबई उपनगर, दि. 7 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024  करीता मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत. 26 – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांनी आज 153- दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची माहिती घेतली.

श्री. भदोरिया यांनी उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांना लोकसभा निवडणूक  नि:पक्षपातीपणे व शांततेत पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले. निवडणूक निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी या कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वय आणि सांघिक प्रयत्नाने काम करावे. मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी, मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. दिव्यांग मतदारांना भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेल्या सुविधा पुरविल्या जातील, याबाबतची दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी श्री. भदोरिया यांनी दिल्या. या भेटीदरम्यान श्री. भदोरिया यांनी 153-दहिसर विधानसभा मतदार संघातील स्ट्रॉंग रूम तसेच रुस्तमजी इंटरनॅशनल शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली.

000

मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर, दि. 7 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या चारही मतदारसंघातून एकूण 87 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान होणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी तेजस समेळ (निवडणूक) उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख मतदार

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबई उत्तर मतदारसंघात 19, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात 21, मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 20, तर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात जिल्हा प्रशासनाने मतदानाची तयारी सुरू केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 74 लाख 48 हजार 383 मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 40 लाख 2 हजार 749, तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 44 हजार 819 एवढी आहे. मतदानासाठी सात हजार 384 मतदान केंद्र असणार आहेत. त्यापैकी दोन हजार 32 मतदान केंद्रांची संख्या तात्पुरत्या स्वरूपातील आहेत. अशा मतदान केंद्रांवर उन्हाळा, अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन केले आहे. तेथे वॉटरप्रुफ मंडप टाकण्यात येतील. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, रॅम्पची व्यवस्था असेल. मतदान केंद्रे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. या मतदान केंद्रांवर आवश्यक 40 हजार 615 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

दोन हजार 728 मतदार करणार गृह मतदान

या चारही मतदारसंघात 16 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने अतिरिक्त बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्याचेही नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांत ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले तसेच 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यास अनुसरून दोन हजार 728 मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी 200 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके 10 व 11 मे 2024 या कालावधीत ही प्रक्रिया पार पाडतील. तसेच दिव्यांग व 85 वर्षांवरील मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र ते मुख्य मार्गावर बेस्टच्या बसची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यक तेथे ऑटो रिक्षांची मदत घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी बूथ लेव्हल मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय उपचार तातडीने मिळतील, असे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मदतीने मतदान केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेनंतर मुंबई उपनगर जिल्ह्यास अधिकची पोलीस कुमक मिळणार आहे.  निवडणूक कामासाठी नियुक्त आणि अत्यावश्यक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी निवडणूक कर्तव्यावरील 16 हजार 596, तर अत्यावश्यक सेवेच्या कर्तव्यावरील सहा हजार 917 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्यासाठी मतदार सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात येतील.

 मुंबई उपनगर जिल्ह्यात 12 निवडणूक निरीक्षक दाखल

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण चार, खर्च तपासणीसाठी सहा, तर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दोन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून ते जिल्ह्यात दाखल झाले आहेत. केंद्रीय यंत्रणा व राज्य यंत्रणेकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी 148 बैठी पथके तर 134 फिरती पथके अशी एकूण 282 पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत विना परवाना, अवैध वाहतूक या प्रकारात 99 लाख 65 हजार रुपये किमतीची 56 हजार 386 लिटर दारू ताब्यात घेतली आहे, तर 17 कोटी 93 लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

मतमोजणीची तयारी सुरू

मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघासाठी मतमोजणी नेस्को, गोरेगाव येथे तर मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघासाठीची मतमोजणी उदयांचल शाळा, विक्रोळी येथे होणार आहे. त्याचीही तयारी सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

00000

 

निवडणूक पोलीस निरीक्षक गौरव शर्मा यांची अंधेरी पश्चिम मतदारसंघात भेट

मुंबई उपनगर दि. 7 :  26 मुंबई उत्तर आणि 27 मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठीचे पोलीस निरीक्षक गौरव शर्मा यांनी 165 मतदारसंघ अंधेरी पश्चिम येथील मोरगाव चाळीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या चाळीतील मतदारांना 20 मे 2024 रोजी आपला मतदानाचा हक्क बजावत मतदान करण्याचे आवाहन केले.

लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक पोलीस निरीक्षक श्री. शर्मा यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघ अंधेरी (पश्चिम) येथील मोरगाव चाळीला भेट दिली. यावेळी त्या मतदारसंघातील आणि चाळीतील सुमारे शंभर मतदार तसेच यावेळी तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहलता स्वामी, आणि वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ‘एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये’, हा उद्देश समोर ठेवून श्री. शर्मा यांनी मतदानाबाबत जनजागृती केली. यावेळी उपस्थितांना आचारसंहितेचे उल्लघंन झाल्यास तक्रार करण्यासाठी सुरू आलेल्या सी व्हिजील (C-Vigil) ॲपबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष निवडणूक पोलिस निरीक्षक आपल्या भेटीला आल्याचे पाहून पोलिसांच्या भेटीचे जनतेने कौतुक केले. या भेटीमुळे मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. यावेळी मतदारांना प्रवृत्त करण्यासाठी श्री. शर्मा यांनी ‘चमकिला’ चित्रपटातील त्यांनी लिहिलेले गाणे म्हणत मतदान करण्यासाठी आवाहन केले.

चलो वोट करो, चलो वोट करो जी, चलो वोट करो मेरे यारो, चलो वोट करो जी, चलो वोट करो जी, अपनी जिमेदारी निभाओ मेरे यारो,

तुम सभी समझदार हो, वोट जरुरी हैं, तुम सभी इमानदार हो, वोट जरुरी हैं,

चलो वोट करो जी, चलो वोट करो जी, चलो वोट करो मेरे यारो, चलो वोट करो जी, चलो वोट करो जी, अपनी जिमेदारी निभाओ मेरे यारो

०००

 

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या  टप्प्यातील अकरा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत  सरासरी  ५३.४० टक्के मतदान

मुंबई, दि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी  ५३.४० टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

लातूर – ५५.३८ टक्के

सांगली – ५२.५६  टक्के

बारामती – ४५.६८ टक्के

हातकणंगले – ६२.१८ टक्के

कोल्हापूर –  ६३.७१ टक्के

माढा – ५०.००  टक्के

उस्मानाबाद –  ५२.७८ टक्के

रायगड – ५०.३१ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  ५३.७५ टक्के

सातारा –  ५४.११ टक्के

सोलापूर – ४९.१७   टक्के

0000

संध्या गरवारे/विसंअ/

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

मुंबई, दि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे  २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदार संघात  दुपारी ३ वाजेपर्यंत  सरासरी  ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

लातूर – ४४.४८ टक्के

सांगली – ४१.३० टक्के

बारामती – ३४.९६ टक्के

हातकणंगले – ४९.९४ टक्के

कोल्हापूर – ५१.५१ टक्के

माढा – ३९.११  टक्के

उस्मानाबाद – ४०.९२ टक्के

रायगड – ४१.४३  टक्के

रत्नागिरी –सिंधुदूर्ग – ४४.७३  टक्के

सातारा –  ४३.८३ टक्के

सोलापूर – ३९.५४ टक्के

***

संध्या गरवारे/विसंअ/

लोकसभा निवडणूक : दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

मुंबई, दि.७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ .५५ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – ३२.७१ टक्के
सांगली – २९.६५ टक्के
बारामती – २७.५५ टक्के
हातकणंगले – ३६.१७ टक्के
कोल्हापूर – ३८.४२ टक्के
माढा – २६.६१ टक्के
उस्मानाबाद – ३०.५४ टक्के
रायगड – ३१.३४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१ टक्के
सातारा – ३२.७८ टक्के
सोलापूर – २९.३२ टक्के

लोकसभा निवडणूक ; सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

मुंबई, दि.,७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात ११वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – २०.७४ टक्के
सांगली – १६.६१ टक्के
बारामती – १४.६४ टक्के
हातकणंगले – २०.७४ टक्के
कोल्हापूर -२३.७७ टक्के
माढा -१५ .११ टक्के
उस्मानाबाद -१७.०६ टक्के
रायगड -१७.१८ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के
सातारा -१८.९४ टक्के
सोलापूर -१५.६९ टक्के

लोकसभा निवडणूक : सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

मुंबई, दि.,७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – ७.९१ टक्के
सांगली – ५.८१ टक्के
बारामती – ५.७७ टक्के
हातकणंगले – ७.५५ टक्के
कोल्हापूर -८.०४ टक्के
माढा -४.९९ टक्के
उस्मानाबाद -५.७९ टक्के
रायगड -६.८४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के
सातारा -७.०० टक्के
सोलापूर -५.९२ टक्के

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई, दि. 6 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

पाचव्या टप्प्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे : धुळे लोकसभा मतदारसंघात 18, दिंडोरी – 10 , नाशिक – 31, पालघर – 10, भिवंडी – 27, कल्याण – 28, ठाणे – 24, मुंबई उत्तर – 19, मुंबई उत्तर पश्चिम – 21, मुंबई उत्तर पूर्व  – 20, मुंबई उत्तर मध्य – 27, मुंबई दक्षिण मध्य – 15 आणि मुंबई दक्षिण –  14 अशी आहे. या 13 मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.

००००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुखमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. २०: आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने...

कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

0
मुंबई, दि.20 :  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत...

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे...