मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरूवार दि. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
राज्य निवडणूक आणि भारत निवडणूक आयोगातील फरक, राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणारी मतदारयादी, मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम, मतदार नोंदणी वाढविण्यासाठीचे प्रयत्न, स्थलांतरित मतदारांच्या नावासंदर्भातील प्रश्न आदी विषयांची माहिती श्री. मदान यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
0000