सोमवार, मार्च 1, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

प्रारुप आराखड्यात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा प्राधान्याने समावेश करावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक संपन्न

Team DGIPR by Team DGIPR
जानेवारी 23, 2021
in चंद्रपूर, जिल्हा वार्ता
1 min read
0
प्रारुप आराखड्यात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा प्राधान्याने समावेश करावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

जळगाव, (जिमाका) दि. 21 – जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2021-22 चा प्रारुप आराखडा बनविताना सर्व संबंधित यंत्रणांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन त्यांनी सुचविलेल्या कामांचा प्राधान्याने समावेश करावा, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, आमदार सर्वश्री. शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील श्रीमती लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे विभागपमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारुप आराखडा हा जिल्ह्याच्या विकासात भर घालणारा असावा, जळगाव जिल्हा हा केळी आणि कापूस पीकासाठी प्रसिध्द असलेला जिल्हा आहे. कापूस पीकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना पीकासाठी पुरेसे पाणी व वीज मिळावी, याकरीता यंत्रणेने विभागामार्फत कामे सुचवितांना या बाबींना प्राधान्य दिले पाहिजे. शेतकरी व नागरीकांना जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध होईल याकरीता लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार वीजेचे ट्रान्सफार्मरचा समावेश प्रारुप आराखड्यात करावा. त्याचबरोबर शासनाच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती उपयोजनेतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या मुला,मुलींसाठी शासकीय निवासी शाळा सुरु करण्यासाठी महसुल विभागाने शासकीय जागा उपलब्ध करुन द्यावी अशी सुचना जिल्हाधिकारी यांना दिली, याकरीता लोकप्रतिनिधींनी त्यांना सहकार्य करावे. शिवाय नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील 12 शासकीय वसतीगृह, 46 आश्रमशाळा, 84 अनुदानित वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी वाटॅरहिटर बसवून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. जिल्ह्यात चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण व्हावे याकरीता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अधिकाधिक रस्त्यांचा समावेश करावा. नागरीकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे याकीरता पाणीपुरवठ्याच्या योजना, युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण मिळून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येईल याकरीता कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, मागासवर्गीयांच्या कल्याणाच्या योजना, ग्रामीण भागातील लोकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, सार्वजनिक आरोग्याचा व महिला व बाल कल्याणाच्या योजनांचाही प्रारुप आराखड्यात समावेश करावा. जिल्ह्यात पर्यटन उद्योग वाढावा याकरीता जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकासावर भर देण्याचे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. विकासात्मक कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिली.

राज्य शासनाच्या निधीतून जिल्ह्यात तालुका क्रीडा संकुले मंजूर असून याचे काम अपूर्ण आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून यासाठी निधी मिळावा, जेणेकरुन ही संकुले पूर्ण करता येईल अशी मागणी उपस्थित लोकप्रतिनिधी केली. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजितदादा पवार यांना भेटून विंनती करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

भविष्यात नागरीकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळण्यासाठी तसेच कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणावर भर देण्यासाठी यंत्रणेने आतापासूनच नियोजन करावे त्याचबरोबर अनुसूचित जाती उपयोजनेतून मोठ्या गावातील समाजमंदिरांमध्ये ग्रंथालय उभारण्याची सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली.

जळगाव जिल्हा नियोजन समितीचा (सर्वसाधारण) सन 2020-21 चा मंजूर नियतव्यय 375 कोटी रुपयांचा असून आहे. सन 2021-22 या वर्षासाठी अंमलबजावणी यंत्रणांनी 525 कोटी 16 लाख 14 हजार रुपयांचा आराखडा प्रस्तावित केला आहे. तर शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समितीपुढे आज 300 कोटी 72 लाख रुपयांचा आराखडा सादर केला असून या प्रारुप आराखड्यावर लोकप्रतिनिधींसह विभागप्रमुखांनी चर्चा केल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीत सांगितले.

00000

बालिका सप्ताहाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव, (जिमाका) दि. 22 – केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त दि. 21 ते 26 जानेवारी, 2021 या कालावधीत जिल्ह्यात बालिका सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ बाबत प्रतिज्ञा घेण्यात येवून स्वाक्षरी मोहिमही राबविण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विनोद ढगे व त्यांच्या चमुने बेटी बचाओ, बेटी पढाओ वर आधारीत पथनाट्य सादर केले.

बालिका सप्ताहात बेटी बचाओ, बेटी पढाओ वर आधारीत चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वेबिनार, Web meeting on Health Nutrition, यशस्वी महिलांच्या प्रेरणादायी यशकथा, पीसीपीएनडीटी कायद्याबाबत कार्यशाळा, मुलीच्या जन्माचे स्वागत, मुलीच्या नावाने झाड लावणे, सेल्फी वुईथ डॉटर, कविता वाचन, घोषवाक्य इ. उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

Tags: लोकप्रतिनिधी
मागील बातमी

तीन हजार महिलांना कौशल्य विकासातून रोजगार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

पुढील बातमी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा गोव्यासह देशभरात होणार विस्तार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

पुढील बातमी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा गोव्यासह देशभरात होणार विस्तार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा गोव्यासह देशभरात होणार विस्तार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मार्च 2021
सो मं बु गु शु श र
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« फेब्रुवारी    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,025
  • 6,727,548

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • माझी कथा
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.