Day: मे 10, 2020

राज्यात कोरोना बाधित ११८८ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात कोरोनाचे एकूण २२ हजार १७१ रुग्ण; ४१९९ रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. १० : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नवीन रुग्णांचे निदान झाले ...

मंत्री परिषद निर्णय :

मजुरांच्या तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून

मुंबई, दि. १० : परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची ...

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

३ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड; ५५ हजार वाहने जप्त मुंबई, दि. १० : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड ...

गरजूंना धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई, दि. १० मे : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ...

खते व बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांध्यावर

खते व बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांध्यावर

दिग्रस येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन यवतमाळ, दि.10 : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी ...

गरीब व गरजू लोकांना होणार धान्य किटचे वाटप

गरीब व गरजू लोकांना होणार धान्य किटचे वाटप

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने निधीची उपलब्धता यवतमाळ, दि.10 : लॉकडाऊनच्या काळात सर्व दैनंदिन व्यवहार बंद असल्यामुळे लोकांच्या हाताला काम नाही. अशा लोकांना ...

४२ दिवसांनी जिल्हाअंतर्गत एसटीचा प्रवास सुरु

४२ दिवसांनी जिल्हाअंतर्गत एसटीचा प्रवास सुरु

हैद्राबादला अडकलेल्या मजुरांना घेऊन एसटी तालुक्याला रवाना चंद्रपूर ,दि. 10 मे : बेचाळीस दिवसांच्या लॉकडाऊन नंतर आंध्रप्रदेश व तेलंगाना राज्यात ...

आदिवासी कुटुंबियांना न्युक्लिअस बजेट योजनेद्वारे दिलासा

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या आदिवासी बांधवाना खावटी योजनेतून मदत

आदिवासी विकास मंत्री ॲङ के.सी. पाडवी यांनी साधला आजी-माजी लोकप्रतिनिधींसोबत संवाद मुंबई, दि,. १० : लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावल्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबांसमोर आर्थिक संकट आले आहे. अशावेळी त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागमार्फत खावटी अनुदानाच्या स्वरुपात मदत देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲङ के. सी. पाडवी यांनी आज विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीतील लोकप्रतिनिधींसोबत बोलताना दिली. तसेच विविध राज्यात व जिल्ह्यात अडकलेल्या आदिवासी बांधवाना सुखरूप त्यांच्या मूळ गावी मोफत परत आणण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.   आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच समाजातील मान्यवरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सुरुवातीस गोंदिया जिल्ह्यातील माजी आमदार दिवंगत श्री.रामरतन राऊत यांना तसेच औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या मध्य प्रदेशातील आदिवासी मजुरांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी श्री.पाडवी यांनी, कोरोना विषाणूच्या  संसर्गाच्या अनुषंगाने  करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे आदिवासी मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या समोर अनेक आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत. या समस्यांचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकप्रतिनिधींना दिली. स्थलांतरित मजुरांना, विद्यार्थ्यांना ,नोकर वर्गांना त्यांच्या मूळ गावी मोफत  पोहोचवण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहितीही त्यांनी दिली.  सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली असून याबाबत रोजगार हमी योजनेच्या विभागाला आवश्यक ते निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी भागातील प्रत्येक जिल्ह्यातून उद्भवलेल्या प्रश्नांची माहिती अॅड.पाडवी यांनी लोकप्रतिनिधींकडून जाणून घेतली. आदिवासी भागांमध्ये रेशन कार्ड नसलेल्या अनेक आदिवासी कुटुंबांना रेशन मिळत नसल्यामुळे यांच्यासमोर उद्भवलेल्या समस्याच्या अनुषंगाने त्यांना तात्काळ ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड देणे, त्याद्वारे अन्नधान्य वाटप करणे यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करत असल्याचेही मंत्री महोदयांनी सांगितले.  आदिवासीच्या जीवनाशी संबंधित योजना राबविणार आदिवासी विकास विभागासमोर आदिवासी जगवण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा असून यासाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या निधीचा वापर करून त्याचे पुनर्नियोजन करून या पुढील काळात फक्त आदिवासींच्या जीवनाशी संबंधित हिताच्या योजना राबविण्यात येतील. यासाठी केंद्रीय निधीच्या सध्या चालू असलेल्या व अद्याप सुरू न झालेल्या सर्व योजनांचा फेरआढावा घेण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांना वीस दिवसांपूर्वीच देण्यात आले असल्याचे व आदिवासी लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे मंत्री  के. सी. पाडवी यांनी सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींना सांगितले. आदिवासी विभागाच्या कामावर मान्यवरांनी व्यक्त केले समाधान  मागील दीड महिन्यात आदिवासी विकास विभागाने तातडीने पावले उचलून आदिवासी नागरिकांना न्याय देण्याची चांगली भूमिका निभावली असल्याचे व याबाबतसमाधान असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे व प्राध्यापक वसंत पुरके यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी केल्या सूचना ...

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांची साथ आवश्यक – पालकमंत्री

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांची साथ आवश्यक – पालकमंत्री

अमरावती, दि. 10 : कोरोना रूग्णांवर उपचार, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा,  दक्षतापालनासाठी सातत्यपूर्ण मोहिमा, अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविणे अशा अनेक कामांमध्ये ...

जिल्ह्यात अडकलेले पंचवीस मजूर, कामगार स्वगृही बिहारला रवाना

जिल्ह्यात अडकलेले पंचवीस मजूर, कामगार स्वगृही बिहारला रवाना

पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून रवानगी अमरावती, दि. 4 : बिहार राज्यातील अमरावती जिल्ह्यात लॉक डाऊनमुळे अडकून पडलेले 25 मजूर ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मे 2020
सो मं बु गु शु
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

चित्रफित दालन

वाचक

  • 4,493
  • 7,683,794