कोरोनाबाधित १५ रुग्णांना डिस्चार्ज - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. २६ : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. मुंबईत १ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला आहे.

डिस्चार्ज देण्यात आलेल्या १५ रुग्णांचे नमुने आधी पॉझीटीव्ह आले होते. त्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता १४ दिवसानंतरचे त्यांचे दोन्ही नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना अजुन पुढील १४ दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  

काल पुण्यात दोघा कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.