कोरोनाच्या दोन्ही रूग्णांवर उपचार सुरू; नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी - पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
प्रशासन सज्ज

पुणे, दि. 10 : पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आलेले आहे. हे रुग्ण नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तर दुसऱ्या रुग्णांमध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाही. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशी माहिती विभागीय आयुक्त डाॅ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

अधिक माहिती देताना डॉ.म्हैसेकर म्हणाले, दोन रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांनी यापूर्वीच्या पंधरा दिवसाच्या  कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी प्रवास केला, त्याची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही व्यक्ती फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुबई येथे 40 जणांच्या ग्रुप सोबत फिरायला गेले होते आणि ते एक मार्च रोजी भारतामध्ये परत आलेले आहे. या दोन व्यक्तीपैकी एका व्यक्तीला त्रास झाल्यामुळे त्यांनी दिनांक ८ मार्च रोजी डॉक्टर कडून आपली तपासणी करून घेतली. त्यावेळी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे. दुबई हे ठिकाण केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांचे यादीमध्ये नसल्यामुळे संशयित रुग्ण 1 मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले नाही. भारतात परत आल्यानंतर या दोन्ही व्यक्तींच्या  संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही रूग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी-कर्मचारी यांचा त्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत रूग्णांच्या कुंटुंबातील 3 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
या दोन्ही व्यक्तींसोबत दुबई येथे गेलेल्या एकूण 40 व्यक्तींची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे विविध जिल्ह्यातील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करत आहे. या दोन्ही व्यक्तींनी ज्या व्यक्तीच्या टॅक्सीने मुंबई वरून पुण्याला प्रवास केला आहे, अशा व्यक्तीची माहिती घेण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना देखील काल रात्री दवाखान्यांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे.


या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस आणि दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पथकाद्वारे हे दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आजपर्यंत दोन्ही महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 21 ठिकाणी 207 बेड अतिदक्षता विभागाच्या सुविधा तसेच विलगीकरण कक्षासहित तयार करण्यात आलेल्या आहेत.

इंडियन मेडीकल असोसिएशनतर्फे जिल्ह‌्यातील सर्व डॉक्टरांना आवाहन करताना ते म्हणाले, त्यांच्याकडे आलेल्या रूग्णांची तपासणी करत असतांना परदेशातून भारतात आलेल्या रूग्णांची माहिती स्वतंत्र ठेवावी,असेही शेवटी ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर रामपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवेउपायुक्त प्रताप जाधव, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर,डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उप विभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख, सचिन बारावकर, डॉ. मितेश घट्टे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.
000000कोरोना के दोनों मरीजों पर हो रहा है इलाज़
नागरिकों ने सावधानी बरतनी चाहिए
प्रशासन सज्ज
- पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे, दि. १० : पुणे शहर में दुबई से भारत लौटे कोरोना के दो मरीज़ मिले है। यह मरीज़ नायडू हॉस्पिटल, पुणे के विलगीकरण कक्ष में दाखिल है और उन पर इलाज़ चल रहा है। हालांकि दोनों की हालत में सुधार है। उनमें से एक मरीज में कोरोना  के सौम्य लक्षण दिखाई दे रहे है। वहीं दूसरे मरीज में अभी तक कोरोना के लक्षण नहीं मिले है। इस मरीज के संपर्क में आए हुए व्यक्ति और जगहों की जानकारी लेकर उन पर भी बारीकी से ध्यान रखा जा रहा है। नागरिकों ने आवश्यक वह ध्यान बरतना चाहिए, यह विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर ने जानकारी में बताया है।

अधिक जानकारी देते हुए डॉ. म्हैसेकर ने कहा कि दो मरीजों की जांच की गई है। उन्होंने पंद्रह दिन की अवधि में कहाँ पर यात्रा की है, इसकी भी जानकारी ली गई है। इन दोनों व्यक्ति फरवरी महीने के अंतिम सप्ताह में दुबई में ४० लोगों के ग्रुप साथ घूमने के लिए गए थे। वे १ मार्च को भारत वापिस आए थे। इन दो व्यक्ति में से एक को तकलीफ होने पर उन्होंने दिनांक ८ मार्च को डॉक्टर से जांच कराई। इस दौरान उनका सैंपल पॉझिटिव निदर्शन में आया है। केंद्र सरकार ने दुबई यह स्थान घोषित किए गए बाधित स्थानों की सूची में नहीं होने से संदेहास्पद मरीज़  १ मार्च को भारत वापिस आने के बाद उनका विलगीकरण नहीं किया गया। भारत में वापिस आने के बाद इन दोनों व्यक्तियों के संपर्क में आए व्यक्ति और जगहों की जानकारी ली गई है। इन दोनों मरीजों का परिवार, मित्र परिवार एवं उनके कार्यालयीन स्थान के अधिकारी-कर्मचारियों की भी जांच की जाएगी। अब तक मरीजों के परिवार के ३ लोगों की सैंपल जांच के लिए भेजे गए है।

इन दोनों लोगों के साथ दुबई में गए कुल ४० लोगों के नाम और उनके संपर्क क्रमांक प्रशासन के पास उपलब्ध है और यह विविध जिले के नागरिक होने से संबंधित जिला प्रशासन उन्हें संपर्क कर उनकी जांच करने को लेकर आवश्यक वह कार्रवाई कर रही है। इन दोनों लोगों ने जिस व्यक्ति के टैक्सी से मुंबई से पुणे तक का सफर किया है, ऐसे लोगों की जानकारी भी ली गई है और उन पर प्रतिबंधात्मक कार्रवाई के रूप में गत सोमवार की रात उन्हें अस्पताल में जांच के लिए दाखिल किया गया है।

इन मरीजों के संपर्क में आए हुए लोगों की जानकारी के लिए और अन्य बातों का ध्यान रखने के लिए कुल पाँच टीम बनाई गई है । इसमें राजस्व, स्वास्थ्य, पुलिस और दोनों महानगरपालिका के अधिकारी और  कर्मचारी को शामिल किया गया है। इन टीमों के द्वारा  दोनों मरीज़ जिस विभाग में तथा परिसर में गए होंगे, वहाँ पर कोरोना बाधित अथवा संदेहास्पद व्यक्ति निदर्शन में आने पर उनकी खातरजमा की जाएगी। इसके अलावा अभी तक दोनों महानगरपालिका के कार्यक्षेत्र में कुल २१ जगहों पर २०७ बेड अतिदक्षता विभाग के सुविधा एवं  विलगीकरण कक्ष के साथ तैयार किया गया है।

इंडियन मेडीकल एसोसिएशन की ओर से जिले के सभी डॉक्टरों से आवाहन करते हुए कहा कि उनकी ओर आए हुए मरीजों की जांच करते समय विदेश से भारत आए मरीजों की जानकारी स्वतंत्र रखी जाए।

इस दौरान जिलाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, पुलिस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे,  उपायुक्त प्रताप जाधव, स्वास्थ्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, निवासी उपजिलाधिकारी डॉ. जयश्री कटारे,  जिला शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. रामचंद्र हंकारे, जिला स्वास्थ्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उप विभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख, सचिन बारावकर, डॉ. मितेश घट्टे, जिला आपदा व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित थे।
००००

Treatment of both Corona patients started
Citizens should take all necessary precautions,
administration prepared
- Pune Divisional Commissioner Dr Deepak Mhaisekar

Pune, March 10:- The two patients were found Corona positive in Pune city had returned from Dubai. Both are quarantined at Naidu Hospital in Pune and the treatment had already started. The condition of both of them is stable. Mild symptoms of Corona were found in one of these two patients, whereas the other has not yet shown any symptoms. The information about all the people who came in contact with these two patients and the places where they have visited, is been observed, keenly. The citizens should take due precautions appealed Divisional Commissioner of Pune Dr. Deepak Mhaisekar.

Giving details he further said that both the patients were tested and the information about the places they travelled in last fortnight had been gathered. It is learnt that both of had visited Dubai with a group of 40 people in February end and returned home on 1st of March. One of these two patients had problems and he visited the doctor on 8th of March. His reports were formed positive but because Dubai had not been included in the list of affected nations declared by the union government, these two were not quarantined on 1st of March when the returned India.

Dr Mhiasekar said that the information of all the people who came in contact with these two patients and also the places where they visited has been received. The screening of their family members, friends and the officers and employees where they are working, will also be done. As of nowthe samples of three family members had been sent for tests. He also said that the names, contact numbers and addresses of the 40 people with whom these two patients visited Dubai, has also been collected. It revealed that they belong to various districts so the administration of these districts have been asked to go for the tests of all these people and the process has been started.

The divisional commissioner also said that the information of the people with whom these two patients came to Pune from Mumbai by taxi had also been obtained and as a part of preventive measure, they have been admitted to the hospitals for observation.

Mr Mhaisekar further said that for gathering information of all those people who came in contact with these two patients, five various squads have been constituted, They include officers and employees from revenue, health and police department and from both the Municipal Corporations. They had been assigned the job to verify whether or not the people with symptoms of Corona are found in the places where the duo visited or among the people, whom they met.

Till date 207 bed Intensive Care Unit has been erected at 21 places in the jurisdiction of both the municipal corporation. Also, the Quarantine (isolated wards) are prepared for combating any situation with full might. Appealing to all the doctors of district through the Indian Medical Association (IMA), he said that the doctors should keep the information of all the patients who are coming to India from foreign lands, separately.

District magistrate Naval Kishore Ram, commissioner of Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) Shravan Hardikar, additional commissioner of Pune Municipal Corporation (PMC) Rubal Agrawal, Joint Police Commissioner Dr Ravindra Shisve, deputy commissioner Pratap Jadhav, Deputy Director of Health Dr Sanjay Deshmukh, residence Deputy Collector Dr Rajashree Katare, district civil surgeon Dr Ashok Nandapurkar, Dr. Ramchandra Hankare, district health officer Dr. Bhagwan Pawar, sub-divisional officer Santosh Kumar Deshmukh, Sachin Baravkar, Dr Mitesh Ghatte, district disaster management officer Vitthal Banote and others were present on the occasion.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.