नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस नामकरणाच्या प्रस्तावास विधानसभेत एकमताने मंजुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 13 : मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव आज संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी विधानसभेत मांडला.

या टर्मिनसचे नामकरण आता नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस असे होणार असून त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी मंजुरी देण्यात आली असल्याचे श्री.परब यांनी यावेळी सांगितले.
या प्रस्तावाला सभागृहात एकमताने संमती देण्यात आली.
००००
अजय जाधव/विसंअ/13.3.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.