जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस दलातर्फे मुंबईत उद्या महिला सुरक्षा रॅली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 7 : जागतिक महिला दिनानिमित्त गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत उद्या रविवार दि. 8 मार्च, 2020 रोजी सायं. 5 वाजता एनसीपीए ते सुंदर महल जंक्शन, मरीन ड्राईव्ह दरम्यान पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा रॅली काढण्यात येणार आहे.

राज्यातील महिलांच्या सुरक्षेची हमी देण्याची संकल्पना या रॅलीमागे असून त्यासाठी गृहमंत्री श्री. देशमुख यांनी पुढाकार घेऊन रॅलीच्या आयोजनाचे निर्देश दिले. या रॅलीमध्ये महिला पोलीस उप आयुक्त, पोलीस निरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी अशा सर्वच महिला अधिकारी-कर्मचारी, शालेय मुली, महिला सहभागी होणार आहेत.


महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, एनजीओ व समाजातील महिलांनी या रॅलीत सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.7.3.2020


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.