'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या 'विकासपर्वाचे शंभर दिवस' या मुलाखतीचा दुसरा भाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'विकासपर्वाचे शंभर दिवस' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. या कार्यक्रमात 'द फ्री प्रेस जर्नल'चे राजकीय संपादक संजय जोग, 'दै.लोकसत्ता'चे राजकीय संपादक संतोष प्रधान व 'दै.सकाळ'चे मुख्य प्रतिनिधी संजय मिस्कीन यांचा सहभाग असलेली मुलाखत 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मंगळवार दि. 17 मार्च 2020 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रक्षेपित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात होत असलेला दिशा कायदा, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय, पर्यटन विकासाच्या अनुषंगाने घेतलेले निर्णय, पाच दिवसांचा आठवडा, पोलीस विभागाचे सक्षमीकरण, मुंबई 24 तास, आरोग्य विभागाचे सक्षमीकरण हा उपक्रम आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.जोग, श्री.प्रधान व श्री.मिस्कीन  यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.