स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात सभापती, अध्यक्षांकडून अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


      
मुंबई, दि. 12 : माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज विधानभवनात सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अध्यक्ष नाना पटोले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधिमंडळातील सदस्यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.