किनारपट्टीच्या भागात जलवाहतूक सुरू करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतभाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवेला सुरुवात

उद्घाटनाच्या औपचारिकतेपेक्षा सेवा सुरू होणे महत्त्वाचे 


मुंबई, दि. 15 : भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रो रो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल. राज्याच्या किनारपट्टीमध्ये अशी जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे.कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही, असे कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र कार्यक्रमाच्या औपचारिकतेसाठी न थांबता प्रवाशांच्या सोयीसाठी लगेच ही सेवा सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या सेवेस त्यांनी आज आपल्या शुभेच्छाही दिल्या.

या सेवेसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून मांडवा जेट्टी येथे 150 कोटी रुपये खर्चून सुविधा निर्माण केल्या आहेत. नवी मुंबईतील नेरुळ, बेलापूर येथून देखील लवकरच जलवाहतूक सुरू करण्याची तयारी आहे. भाईंदर ते डोंबिवली अशा जलवाहतुकीच्या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळून दोन वर्षांत तीही सेवा सुरू होईल. एकूणच जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटन व रोजगार वाढविला जाईल, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.भाऊचा धक्का ते मांडवा हे समुद्री अंतर 19 किमी असून या जलवाहतुकीने एक तासात कापता येते. रस्त्याने जाण्यासाठी चार तास लागतात. रो पॅक्सची क्षमता एकावेळी 500 प्रवासी आणि 145 वाहने नेण्याची आहे

रो रो सेवेची माहितीभाऊचा धक्का ते मांडवा रो -पॅक्स सेवेमुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन खर्चात बचत होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. भाऊचा धक्का येथील जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत करण्यात आलेले असून मांडवा येथील जेट्टीवर टर्मिनलचे बांधकाम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत करण्यात आले आहे .केंद्र शासनाची  सागरमाला योजना आणि राज्य शासनाकडून 50-50 टक्के या प्रमाणात निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानच्या रो-पॅक्स सेवेसाठी एमटूएम जहाज मुंबईत दाखल झाले आहे.

०००


भाऊचा धक्का से मांडवा जेट्टी रो रो सेवा शुरू

उद्घाटन की औपचारिकता से जरूरी है यह सेवा शुरू होना

किनारपट्टी के परिसर में जलवाहतूक शुरू करने के लिए प्राथमिकता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 15 : भाऊचा धक्का से मांडवा जेट्टी रो रो सेवा यानि महाराष्ट्र की जलवाहतुक की सेवा की मिल का पत्थर है। राज्य की किनारपट्टी में इस तरह की जलवाहतूक सेवा फायदेमंद साबित होगी, इस बात को ध्यान में रखते हुए यह सेवा शुरू करने के लिए प्राथमिकता दी गई है, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने इस दौरान कहा।

भाऊचा धक्का से मांडवा रो पैक्स फेरी सेवा और मांडवा टर्मिनल सेवा आज से शुरू हुई है ।

कोरोना संदर्भ की स्थिति को ध्यान में रखते हुए भाऊचा धक्का से मांडवा रो रो सेवा का उद्घाटन समारोह नहीं होगा, यह गत शनिवार को ही मुख्यमंत्री ने घोषित किया था। लेकिन कार्यक्रम की औपचारिकता के लिए न रुकते हुए यात्रियों की सुविधा हेतु यह सेवा तत्काल ही शुरू करने के निर्देश भी उन्होंने दिए। इस दौरान उन्होंने शुभाकांनाएं भी दी।

मुख्यमंत्री  ने अपने संदेश में कहा कि इस सेवा के लिए केंद्र और राज्य सरकार ने मिलकर मांडवा जेट्टी में 150 करोड़ रूपए खर्च करते हुए सुविधाओं का निर्माण किया है। नई मुंबई के नेरु, बेलापूर में भी जल्द ही जलवाहतूक शुरू करने की तैयारी में है। भाईंदर से डोंबिवली इस जलवाहतुक के प्रारूप को अंतिम मंजुरी मिलकर दो साल में वह भी सेवा शुरू होगी। पूरी स्थिति को देखते हुए जलवाहतुक के माध्यम से पर्यटन एवं रोजगार में वृद्धि होगी।

भाऊचा धक्का से मांडवा यह समुद्री दूरी (अंतर) 19 किमी है और यह दूरी जलवाहतुक से एक घंटे में पूरा की  जा सकती है। हालांकि रास्ते से जाने के लिए चार घंटे लगते है। इसके अलावा रो पॅक्स की एक समय में 500 यात्री और 145 वाहन ले जाने की क्षमता भी इसमें है।

रो रो सेवा की जानकारी

भाऊचा धक्का से मांडवा रो -पॅक्स सेवा से यात्रा का समय और इंधन खर्च में  बचत होगी।  मुंबई, पनवेल परिसर के वाहतुक की समस्या कम होने में भी मदद होने के साथ-साथ पर्यटन को भी गति मिलेगी। भाऊचा धक्का स्थित जेट्टी एवं टर्मिनल का निर्माणकार्य मुंबई पोर्ट ट्रस्ट के जरिये किया गया है और मांडवा स्थित जेट्टीवर टर्मिनल का निर्माणकार्य महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड के जरिये किया गया है। केंद्र सरकार की सागरमाला योजना और राज्य सरकार की ओर से 50-50 फीसदी इस मात्रा में निधि इसके लिए उपलब्ध कराया गया है। भाऊचा धक्का से मांडवा की रो-पॅक्स सेवा के लिए एमटूएम जहाज मुंबई में दाखिल हुआ है

0000
Ro-Ro jetty service began from Bhaucha Dhakka to Mandawa

It is more important to start the service than to formal inauguration

Preference to start water transport in coastal areas- Chief Minister Uddhav Thackeray

Mumbai,15.March.20: Ro ro service from Bhaucha Dhakka to Mandawa Jetty will be a milestone in Maharashtra's shipping service. Priority will be given to launch such service, considering that such transport will be beneficial in the coastal area of the state said Chief Minister Uddhav Thackeray.

Bhaucha Dhakka to Mandawa Row Pax ferry service and Mandawa Terminal services have started from today.

Taking into account the situation in the context of the Corona, the Chief Minister had yesterday announced that the inauguration program of this service would not be conducted.  However, he had instructed to start this service immediately for the convenience of the travelers, without stopping for the formality of the program. He also extended his best wishes to this service today

For this service, the Central and State Government have jointly created facilities at Mandawa Jetty at a cost of Rs 150 crore. Preparations are also underway to start the service from Nerul, Belapur in Navi Mumbai. The same service will be launched in two years with final approval for the transport of Bhainder to Dombivali. The Chief Minister said in his message that tourism and employment would be increased through overall transportation.

The distance of Bhaucha Dhakka to Mandawa is 19 km. It can be covered in one hour by this freight. It takes four hours to reach by the road. The Row Packs have the capacity to carry 500 passengers and 145 vehicles at a time


Ro ro Service Information

Bhaucha Dhakka to Mandawa ro-pax service will save travel time and fuel costs. It will reduce the traffic congestion in the Panvel and Navi Mumbai area and also boost tourism. The jetty and terminal at Bhaucha Dhakka has been constructed by the Mumbai Port Trust and the terminal has been constructed on the Jetty at Mandawa by the Maharashtra Maritime Board .The Central Government has provided the Sagarmala scheme and 50-50 percent funds from the State Government. The M2M ship has landed in Mumbai for Ro-Pax service between Bhaucha Dhakka to Mandawa.

०००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.