स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आवारामध्ये शंकरराव चव्हाण संशोधन केंद्र, संकुलाचे काम लवकर पूर्ण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 11 : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आवारामध्ये स्व. शंकरराव चव्हाण संशोधन केंद्र आणि संकुलाचे बांधकाम लवकर पूर्ण करावे. त्यासाठी सर्व मदत करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विकासासंदर्भात बैठक झाली.

श्री. सामंत म्हणाले, संशोधन केंद्र आणि संकुलाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता घेऊन कामे सुरू करावीत. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व मुला-मुलींचे वसतिगृह उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. धनराज माने, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव सर्जेराव शिंदे,  तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
000
काशिबाई थोरात/वि.सं.अ./11/02/2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.