जय महाराष्ट्र कार्यक्रमात उद्या नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत'दिलखुलास' कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी मुलाखतीचे प्रसारण

मुंबई, दि. 13 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची 'स्वच्छतेतून समृद्धीकडे' या विषयावर विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार  दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होईल. तर 'दिलखुलास' कार्यक्रमात सोमवार दि. १७ व मंगळवार दि.१८ फेब्रुवारी रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  सकाळी 7: 25 ते 7:40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
   
नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्वच्छ शहर करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजना, तारांकित मानांकन अर्थात Star Rating च्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या  उपाययोजना, कचरा संकलन व वर्गीकरणाच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेने केलेली कार्यवाही, ओल्या कचऱ्याची विकेंद्रित पद्धतीने केलेली विल्हेवाट, संकलित कचऱ्यावरील प्रक्रिया, प्लास्टिक प्रतिबंधासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजना,स्वच्छतेविषयी जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी पालिकेने केलेले  प्रयत्न याबाबत सविस्तर माहिती नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे  यांनी 'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास' कार्यक्रमात दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.