मुंबईकरांसाठी उत्तम, आधुनिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरविणार - वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबईदि. 4 : मुंबईतील कामा रुग्णालयजी.टी. रुग्णालयसेंट जॉर्जेस रुग्णालय व जे.जे. रुग्णालयातील समस्या सोडवून मुंबईकरांसाठी उत्तम व आधुनिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. मुंबईतील वैद्यकीय सेवा समस्यांबाबत बैठक घेण्यात आली.

श्री.पाटील-यड्रावकर म्हणालेमुंबईमधील रुग्णालयात दर्जेदार उपकरणे वापरण्याबाबत संबंधिताना सूचना देण्यात आल्या आहेत. आय.सी.यु. बेडची संख्या वाढविण्यात येईलअपघात विभागात डॉक्टरांची उपलब्धता करुन देण्यात येईलव्हेंटीलेटर्सची संख्या वाढविण्यात येईलयुरॉलॉजी विभागसी.टी.स्कॅन सेवाएम.आर.आय. तसेच कँन्सर पीडितांसाठी पेट स्कॅन सेवा पुरविण्याबाबतही योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चारही रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईलसफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल. सिनिअर डॉक्टरांची संख्या जेथे कमी असेल तेथे वाढ करण्यात येईल. मुंबईतील चारही रुग्णालयातील समस्या व अडचणी सोडवून मुंबईकरांसाठी उत्तम व आधुनिक वैद्यकीय सेवा देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही श्री. पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.तात्याराव लहानेजे.जे.रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळेसेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मधुकर गायकवाड आदी उपस्थित होते.
000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/4.2.2020


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.