देशाची एकात्मता टिकविण्यात केरळचे मोठे योगदान – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतराज्यपालांच्या उपस्थितीत बॉम्बे केरळीय समाज संस्थेचा ९०

 वा वर्धापनदिन संपन्न 

मुंबई, दि.9 : भारतातील लोकांमध्ये भाषा, लिपी, धर्म, पेहराव आदी अनेक भेद असले तरीही आपला देश संस्कृतीच्या धाग्याने घट्ट विणला गेला आहे. केरळचे देशाच्या संस्कृतीमध्ये तसेच एकात्मतेमध्ये मोठे योगदान असल्याचे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे काढले.  

मुंबईमध्ये स्थलांतरित झालेल्या काही मल्याळी लोकांनी सन 1930 साली स्थापन केलेल्या बाँबे केरळीय समाज या संस्थेच्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त संस्थेतर्फे वर्षभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'नवती समारोहाचे' उद्घाटन शनिवारी (दि. 8) राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत हिंदू कॉलनी दादर येथील बी.एन.वैद्य सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते.  

राज्यपाल म्हणाले, तेराशे वर्षांपूर्वी केरळच्या कालडी येथे जन्मलेल्या आद्य शंकराचार्यांनी देशाच्या अध्यात्मिक तसेच, सांस्कृतिक संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी देशभरात भ्रमण करून कांचीपुरम, द्वारका, पुरी व बद्रीनाथ येथे मठ स्थापन करून समाजाच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न केले. 

मल्याळी भाषा व संस्कृती संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या बाँबे केरळीय समाज संस्थेचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मातृभाषेच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. मातृभाषेत शिक्षण देणारे देश खरी प्रगती करतात असे त्यांनी सांगितले. 

बाँबे केरळीय समाज ही केरळबाहेरची सर्वात जुनी मल्याळी संस्था असून सन 1958 साली माटुंगा येथे संस्थेच्या 'केरळ भवनम्'चे उदघाटन तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांनी केले होते. सन 1962 साली मुंबई महानगर पालिकेने समाजाला शिवाजी पार्क येथे स्पोर्ट्स पॅव्हिलियन साठी जागा दिली. संस्था आज विविध ठिकाणी आयुर्वेद उपचार, पंचकर्म चिकित्सा, वाचनालय, 'विशाल केरळम' मासिक, मल्याळी भाषा वर्ग, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथक नृत्य वर्ग तसेच संगीत वर्ग चालवित आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश कुमार मधुसुदनन यांनी दिली.        

बाँबे केरळ समाजच्या नव्वदी निमित्त केरळचे लोकजीवन व संस्कृती तसेच मुंबईचे जनजीवन दर्शविणाऱ्या गाण्याचे उद्घाटन करण्यात आले.  

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक सुभाष चंद्रन, सचिव प्रेम राजन नाम्बियार, 'नवती समारोह' समितीचे अध्यक्ष डॉ पी.जे. अप्रेन, आयकर विभागातील सह आयुक्त ज्योतीस मोहन आदी उपस्थित होते. यावेळी एका संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले.

0000


90th Anniversary Celebrations of Bombay Keraleeya Samaj launched

Maharashtra Governor hails contribution of Kerala in national integration

Mumbai 9 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari launched the yearlong ‘Navathi Celebrations’ of the Bombay Keraleeya Samaj on the occasion of completion of 90 years to the establishment of the community organization in Mumbai on saturday (8th Feb).

Sahitya Academy Award and Odakkuzhal Award recipient Subhash Chandran, Joint Commissioner of Income Tax Jyothis Mohan, President of the Bombay Keraleeya Samaj Dr Sureshkumar Madhusudhanan, Secretary Premarajan Nambiar and Chairman of the Navathi Celebrations Committee Dr P J Aprain were prominent among those present.

Speaking on the occasion, Governor Koshyari hailed the contribution of Kerala in India’s cultural integration. He noted that more than 1200 years ago, a young Adi Sankaracharya had set off from Kalady in Kerala to set up four Peethams at Kanchi, Dwarka, Puri and Badrinath. This, according to him, fostered the cultural integration of the nation.  The Governor said, even though India is a colourful mosaic of people who spoke differently, ate differently and practiced different faiths, the country was united by the common thread of culture.

President Dr Sureshkumar Madhusudhanan informed that the Bombay Kerala Samaj was founded by the migrant Malayalee community as Mumbai’s first institution to serve the needs of Malayalees. He said the organization is the oldest Malayali organization outside Kerala.

Madhusudhanan recalled that ‘Kerala Bhavanam’, the Samaj’s own building was inaugurated in Matunga by India’s then Defence Minister V K Krishna Menon in the year 1958.  According to him, the Municipal Corporation of Mumbai allotted a sports pavilion to the Samaj at Shivaji Park. The Samaj is engaged in educational, health and wellness and sports and recreation activities. He further informed that the Samaj runs a Library and publishes an In house magazine ‘Visala Keralam’.

A title song depicting the culture of Kerala and vibrancy of Mumbai was launched by the Governor


००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.