भंडारा-गोंदिया जिल्हा कंत्राटदारांची जीएसटी संदर्भात विधानभवनात बैठक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 5 : भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील कंत्राटदार असोसिएशनच्या जीएसटी संदर्भात आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक पार पडली.

श्री. पटोले म्हणाले, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील जीएसटी संदर्भातील काही त्रुटी आहेत. त्या तपासून घ्याव्यात. जीएसटी संदर्भातील अहवाल चार्टर्ड अकाऊंटंटकडून तयार करुन सादर करावा. सीएसआर किंवा इस्टिमेटमध्ये त्याचे प्रोव्हिजन तयार करावे. अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

जलसंधारण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रलंबित असलेल्या पदोन्नतीबाबतही श्री.पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जलसंधारण विभागातील सेवाज्येष्ठता तपासून घेऊन या विभागातील अधिकारी व कर्मचारी हे पदोन्नतीपासून वंचित राहू नये त्याकरिता राज्यभरातील सेवाज्येष्ठता यादी तपासून तातडीने अहवाल सादर करावा, असे निर्देश श्री. पटोले यांनी जिल्हा परिषद अभियंता संघटनेला यावेळी दिले.

या बैठकीस प्रधान सचिव राजगोपाल देवरा, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, उपसचिव म.रा.शेळके, सहसचिव वित्त डी.आर.गावडे, शाखा अभियंता नाशिक रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.
000
प्रवीण भुरके/5.2.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.