चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाला गती देण्याचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 7 : चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण आणि बांधकामाला गती द्यावी. यासाठीच्या तांत्रिक बाबी दूर करून प्राधान्यक्रमाने या सांस्कृतिक केंद्राचे काम पूर्ण करावे, अशा सूचना परिवहन व संसदीय कार्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे  पालकमंत्री अनिल परब यांनी दिल्या. विधानभवन येथे यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
         
श्री.परब म्हणाले, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सांस्कृतिक केंद्राचे काम लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी गरज पडली तर विशेष सभा घेऊन हा विषय तात्काळ मार्गी लावावा, असेही श्री.परब यांनी यावेळी संगितले.

बैठकीला चिपळूणच्या नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे, श्री. उमेश सकपाळ, सौ. वर्षा जागुष्टे, श्री. मोहन मिरगल, श्री. शशिकांत मोदी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००
  काशीबाई थोरात वि.सं.अ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.