वाटुमल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या अडचणीसंदर्भात बैठक संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 13 : मुंबईतील वाटुमल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर टेक्नोलॉजी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बाबी पूर्ण करून त्यांना संबंधित संस्थेच्या इतर महाविद्यालयांमध्ये  सामावून घेण्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

विधानभवनात वाटुमल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, वरळी, मुंबईमधील कर्मचाऱ्यांच्या अडचणींसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

श्री. सामंत म्हणाले, अनुदानित महाविद्यालय पुन्हा विना अनुदानित करण्याचा पूर्वी जो निर्णय घेण्यात आला आहे, त्यामध्ये कर्मचाऱ्यांचाही विचार करणे आवश्यक होते. मात्र, त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील प्रश्न लक्षात न घेतल्यामुळे त्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून याबाबत संबंधित संस्थेसोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यात येतील, असे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ, अंजली दमानिया, वाटुमल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, वरळी, मुंबई येथील कर्मचारी तसेच विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000
काशिबाई थोरात/वि.सं.अ./13/02/2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.