आश्रमशाळा संस्था चालकांच्या विविध प्रश्नांचा आढावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 11 :  आदिवासी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या खासगी आश्रम शाळा संस्था चालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक झाली.

खासगी आश्रमशाळांमध्येही शासकीय आश्रमशाळांप्रमाणे विद्यार्थी संख्येनुसार समान कर्मचारी वर्ग असावा, विद्यार्थीनिहाय अनुदान द्यावे, निवासी विद्यार्थ्यांचे सुट्टीमध्ये मृत्यू झाल्यास संस्था चालकाकडून अनुदानाची रक्कम वसूल करू नये, आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.

राज्यशासनाने आश्रमशाळांचे अनुदान आता ऑनलाईन केले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आवश्यक आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांमध्ये विशेष शिबिर घ्यावे, अशा सूचना श्री. पटोले यांनी यावेळी केल्या.

यावेळी सहसचिव दे. आ. गावडे, विजाभज संचालक युवराज पाटील, आदिवासी आश्रमशाळा संचालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सरोदे, देवाजी कापगते, भरतलाल कोरे, अशोक वानखेडे आदी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.