सोलापूर जिल्हा : मौजे मोडनिंब, माढ्याला एमआयडीसी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 11 : सोलापूर जिल्ह्यातील मौजे मोडनिंब व माढा या ठिकाणी नव्याने एमआयडीसी निर्माण झाल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होईल. यासाठी मौजे मोडनिंब व माढा येथे एमआयडीसी निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करा, असे निर्देश  राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.


यावेळी बैठकीत औद्योगिक क्षेत्रासाठी पा पुरवठा तसेच इन्फ्रास्ट्रक्चर रेट गृहीत धरून याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावा, असेही यावेळी श्रीमती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.


बैठकीला आमदार बबनराव वि. शिंदे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपअभियंता सुनिल चि. कोलप, भूसंपादनचे महाव्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे आदी अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.