‘वृक्षमित्र’ स्पर्धेत राजभवनाची हॅटट्रीक; सलग तिसऱ्या वर्षी राजभवन उद्यानाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 12 : रुपारेल महाविद्यालय येथे नुकत्याच झालेल्या ५९व्या भाजीपाला, फळे व फुलांच्या प्रदर्शन व स्पर्धेत राजभवन येथील राज्यपालांच्या उद्यानाला सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा फिरता चषक प्राप्त झाला आहे.राज्यपालांची कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप

‘वृक्षमित्र’ स्पर्धेतील कामगिरीबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनातील उद्यान अधीक्षक व बागकाम कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचे अभिनंदन केले.

‘नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्रीज’ या वृक्षमित्र संस्थेच्या वतीने मुंबईतील महानगपालिका,  शासकीय,निमशासकीय संस्था,रेल्वे तसेच व्यावसायिक संस्थांसाठी  उत्कृष्ट उद्यान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मलबार हिल येथील राजभवनातील राज्यपालांच्या उद्यानाला प्रथम दोन बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.   याशिवाय पुष्प प्रदर्शन तसेच वैशिष्ट्यपूर्ण सजावट यांसह इतर स्पर्धांमध्ये राजभवनाला पाच बक्षीसे मिळाली.

दिनांक ८ व ९ फेब्रुवारी रोजी  झालेल्या बक्षीस समारंभात हे पुरस्कार देण्यात आले. जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.उषा थोरात, सोसायटीचे अध्यक्ष डॉ अशोक कोठारी व उपाध्यक्ष डॉ अरुण सावंत तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांच्या हस्ते वैशिष्ट्यपूर्ण सजावटीचे पुरस्कार देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.