दुष्यंत चतुर्वेदी यांना विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 7 : नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य दुष्यंत सतिश चतुर्वेदी यांना आज विधानभवनात विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

श्री. चतुर्वेदी हे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण संस्थेद्वारे विधानपरिषदेत निवडून आले आहेत. शपथविधी समारंभावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, वनमंत्री संजय राठोड, परिवहन मंत्री अनिल परब, विधिमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत तसेच विधानपरिषद सदस्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.