पुणे येथे दाखल केलेल्या चिनी प्रवाशाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


राज्यातील 35 पैकी 30 जणांचा अहवाल निगेटीव्ह

मुंबई, दि.8 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील नायडू रुग्णालयामध्ये निरिक्षणाखाली असलेल्या चिनी प्रवाशासह आणखी 5 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात मूळच्या केरळमधील आणि वुहान शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना खबरदारी म्हणून भरती करण्यात आले आहे. या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत.  त्यांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येत आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्या 35पैकी 30 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 हजार 84 प्रवासी तपासण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून 140 प्रवासी आले आहेत. 

ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 35 जणांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये काल संध्याकाळी कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या मूळच्या केरळमधील आणि वुहान शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या दोघांना कोणतीही लक्षणे नसली तरी खबरदारी म्हणून त्यांना भरती करून प्रयोगशाळा तपासणी करण्यात येत आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्या 35 पैकी 30 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. 

काल नायडू रुग्णालयात भरती करण्यात आलेला चिनी प्रवासी देखील करोना आजारा करिता निगेटिव्ह आढळला आहे. जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवासीही कोरोना करता निगेटिव्ह आढळला आहे . उरलेल्या 5 जणांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील.  

बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 140 प्रवाशांपैकी 57 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. 
000000
अजय जाधव.8.02.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.