वन विभागाने एमटीडीसीच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन विकासाचा बृहत् आराखडा तयार करण्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि.3 - महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन विकासाचा बृहत् आराखडा तयार करावा असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. वनविभागाच्या निसर्ग पर्यटन योजनेचा आढावा मंत्री. श्री. राठोड यांनी मंत्रालयात घेतला त्यावेळी ते बोलत होते.

निसर्ग पर्यटन मंडळाचे बळकटीकरण
वनमंत्री श्री. राठोड  म्हणाले, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे बळकटीकरण करण्याची गरज आहे . त्या दृष्टीने या मंडळातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत अशा सूचना त्यांनी केल्या.निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास झाल्यास त्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे त्यांनी सांगितले. वनक्षेत्राच्या आसपास राहणाऱ्या स्थानिकांमध्ये वनसंरक्षणाबाबत जागृती निर्माण करावी तसेच या चळवळीत लोकसहभाग वाढवण्याचे निर्देशही मंत्री. श्री.राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पर्यटकांना सुविधा देणार
  
श्री. राठोड म्हणाले, निसर्ग पर्यटनाचा विकास करण्याच्या दृष्टीने पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याची गरज आहे. वनक्षेत्रातील रस्ते तसेच निवासाच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी असे निर्देशही मंत्री. श्री राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले.
     
यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. रामबाबू, नितीन काकोडकर, पी. साईप्रकाश तसेच महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
0000
देवेंद्र पाटील/विसंअ/3.2.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.