असा होता आठवडा (दि. ९ ते १५ फेब्रुवारी, २०२०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतगेल्या आठवड्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा (न्यूज डायजेस्ट)

दि. 9 फेब्रुवारी 2020

·      'काकासाहेब चितळे यांनी केवळ व्यवसाय केला नाही तर दुग्ध उत्पादन कसे वाढेल तसेच चांगल्या गाई व म्हशींच्या प्रजाती कशा निर्माण होतील यासाठी संशोधनावर भर दिला. त्यांच्या निधनाने दूरदृष्टी असलेला मेहनती व अभ्यासू उद्योजक राज्याने गमावला,' अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची काकासाहेब चितळे यांना श्रद्धांजली.
·      काकासाहेब चितळे यांच्या निधनाने दुग्धोत्पादक क्षेत्रातील संशोधक गमावला, असल्याची शोकभावना, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री. सुनील केदार यांच्याद्वारे व्यक्त.
·      पुणे येथे दाखल केलेल्या चिनी प्रवाशाचा अहवाल  कोरोना निगेटिव्ह,राज्यातील 35 पैकी 30 जणांचा अहवाल निगेटीव्ह, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 हजार 84 प्रवासी तपासण्यात आले, आतापर्यंत राज्यात बाधित भागातून 140 प्रवासी आल्याची आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांच्याद्वारे माहिती प्रसृत.
·      उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांचे निर्देश :- महाआयटी अंतर्गत एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली (आययुएमएस) ज्या विद्यापीठांनी  सुरु केली नसेल त्यांनी तातडीने ही प्रणाली सुरू करा. यामधून कोणत्याही विद्यापीठाला बाहेर राहता येणार नाही. सर्व विद्यापीठाच्या कामांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी विद्यापीठांमध्ये ही प्रणाली लागू, विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे ॲकेडमिक, प्रवेश, महाविद्यालय, मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रशासन यांच्याशी निगडीत मॉड्युल्स यांचा समावेश, गुणवत्तेच्या आधारे प्रवेश, जागा वाटप, नोंदणी प्रक्रिया, वसतीगृह नोंदणी, हजेरी, शुल्क, अभ्यासक्रम, ॲकेडमिक कॅलेंडर, परीक्षा व्यवस्थापन, संशोधन व्यवस्थापन, ई-सर्व्हिस बुक, पदोन्नती, भरती, पेन्शन, वित्त, लेखा, ई-निविदा, ग्रंथालय यांचे एकत्रिकरण, यामध्ये 14 विद्यापीठ, 4 हजार 600 पेक्षा अधिक महाविद्यालये, 26 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी आणि 80 हजारपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश.
·       डॉ. अशोक मोडक लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या संदर्भात पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या  हस्ते प्रकाशन.
·      बांधकाम कामगार,सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, कंपनी मधील कामगार व इतर क्षेत्रातील संघटीत व असंघटित कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी एका डिजिटल चेकअप बसचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत लोकार्पण.
·      संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याद्वारे सह्याद्री अतिथीगृह येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
·      राज्य पोलीस दलाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये पुरुषांमध्ये उत्तर प्रदेशच्या राहुलकुमार पाल याने तर महिलांमध्ये ज्योती गवते यांना पहिला क्रमांक. वांद्रे-वरळी सी-लिंक येथे पहाटे 5.40 वाजता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याद्वारे झेंडा दाखविल्यानंतर मॅरेथॉनचा प्रारंभ.क्रीडामंत्री सुनील केदार उपस्थित. गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे उपस्थित.  
·      कृषी मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्याद्वारे प्रसृत माहिती :- येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार, महाडीबीटी पोर्टल” च्या माध्यमातून ही प्रक्रिया ऑनलाईन राबवणार, शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी प्रत्येकवेळी स्वतंत्र अर्ज द्यावा लागणार नाही, अर्जावरील कार्यवाहीचे एसएमएस  लाभार्थ्याला पाठविले जातील. महाडीबीटी पोर्टल”  “महाभूलेख” संकेतस्थळाची जोडणी करण्याचे काम प्रगतिपथावर, ते पूर्ण होताच शेतकऱ्यांना अर्जासोबत “सातबारा” आणि 8अ ही कागदपत्रे द्यावी लागणार, या योजनेचे मोबाईल ॲप विकसित करणार, महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देणारा कृषी विभाग हा पहिला विभाग,एकदा अर्ज केला की पुन्हा अर्जाची गरज नाही. ही प्रणाली एखाद्या शेतकऱ्याला विशिष्ट योजनेतून त्याच्या मागणीनुसार लाभ देता येत नसेल तर अन्य दुसऱ्या कुठल्या योजनेतून देण्याची कार्यवाही करेल, एखाद्या वर्षी शेतकऱ्याची निवड झाली नाही तर त्याचा अर्ज बाद न होता पुढच्या वर्षासाठी तो ग्राह्य धरला जाईल. या प्रणालीद्वारे राज्यात एकाच वेळी लॉटरी पद्धतीने तालुकानिहाय लाभार्थ्यांची निवड होणार.
·      केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत 23 व्या ई -गव्हर्नन्स परिषदेचा मुंबईत समारोप.
·      मुंबईमध्ये स्थलांतरित झालेल्या मल्याळी लोकांनी सन 1930 साली स्थापन केलेल्या बाँबे केरळीय समाज या संस्थेच्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संस्थेतर्फे वर्षभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'नवती समारोहाचे' राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उदघाटन.

दि. 10 फेब्रुवारी 2020

·      हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूमुळे व्यथित; गतीने न्याय मिळण्यासाठी यंत्रणांना निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन.
·      हिंगणघाटप्रकरणातील आरोपीला कृत्याची जबर शिक्षा लवकरच मिळेल असे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे प्रतिपादन.
·      पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रवींद्र नाट्य मंदिर) येथे  महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशन लि, मुंबई यांचा 24 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. गृहमंत्री श्री. अनिल देशमुख उपस्थित.
·      हिंगणघाट जळीता हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती,आरोपीला कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करण्याची  मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची घोषणा.
·      उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यालयांच्या बांधकामासंदर्भात सादरीकरण, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश : अवैध मद्य आणि मद्यार्क वाहतुकीमुळे राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याने अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपासणी चौक्यांची संख्या वाढवा. नाक्यांवर कडक तपासणी करा. विषारी ताडीमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी गांर्भीयाने विचार करा,राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालये शासकीय जागेत बांधताना ग्रीड बिल्डींगसंकल्पनेच्या बरोबरीने सौरऊर्जा यंत्रणा, इमारतीची स्वच्छता आदी बाबींना प्राधान्य द्या. राज्यातील भाड्याच्या इमारतीत असणाऱ्या कार्यालयांच्या खर्चाचा जिल्हानिहाय आढावा घ्या.
·      हिंगणघाट येथील महिला अध्यापिकेच्या निधनाबद्दल राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून तीव्र दुःख.
·      अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेची शिधापत्रिका मिळण्याबाबतची बैठक. ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन वा सामाजिक आधार नसलेल्या व्यक्ती, ग्रामीण कारागीर अशांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्याचा निर्णय.
·      शाळा म्हणजे विचार आणि संस्कारांची शिदोरी असल्याचे श्री. ठाकरे यांचे प्रतिपादन. मुख्यमंत्री        श्री. उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांचा सत्कार, पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे उपस्थित.
·      कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निरीक्षणाखालील सर्व 37 प्रवासी निगेटिव्ह असल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १६६ प्रवाशांपैकी ७२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण. सपंर्क - राज्य नियंत्रण कक्ष, 020-२६१२७३९४, टोल फ्री क्रमांक १०४.
·      अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन सोबत बैठक. स्वस्तधान्य दुकानदार,केरोसिन परवाना धारकांच्या समस्या सोडण्याचे श्री. भुजबळ यांचे सूतोवाच.
·      वन मंत्री श्री. संजय राठोड यांच्या उपस्थितीत ‘कॅम्पा’  कार्यक्रमाचे नियोजन व आढावा बैठक. पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत कामांसाठी 500 कोटींच्या आराखड्यास मंजुरी.       मंत्री महोदयांचे निर्देश :- कॅम्पा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधी अंतर्गत ग्रामीण भागातील वणवा  प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करा ,गॅस वाटप करणे तसेच जलसंधारणाची कामे करणे यासाठी हा निधी प्राधान्याने वापरा, कॅम्पा मधून वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कामे करा ,यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा वनविभागांतर्गत टिपेश्वर अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यासाठी बृहत आराखडा तयार करा, टिपेश्वर अभयारण्य अंतर्गत निसर्ग पर्यटन विकासासाठी कामे सुरू करा.
·      संपादक हेमराज शाह यांच्या 'वार्ता विशेष' या पुस्तकाचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन.
·      विकासकांच्या क्रेडाई- नेरेडको संस्थेसोबत मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची बैठक. बैठकीला नगर विकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब उपस्थित. मुख्यमंत्र्यांचे निर्देश :- विकासकांच्या समस्या सोडविण्यासाठी क्विक रिस्पॉन्स विंडो स्थापन करणार, त्यासाठी सुकाणू समिती स्थापन करणार, त्यामध्ये, गृहनिर्माण मंत्री, नगर विकास मंत्री, परिवहन मंत्री, मुख्य सचिव,नगरविकास, महसूल, अर्थ खात्यांचे प्रधान सचिव, मुंबई व ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, म्हाडाचे उपाध्यक्ष व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नेरेडको संस्थेचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी , राजन बांदलेकर, नयन शाह, शाहिद बलवा, बोमन ईराणी, अजय अशर, विनोद गोएंका, डॉमनिक रोमेल आणि दिलीप ठक्कर  यांचा समावेश. झोपडपट्टी पुनर्वसन योजना कशामुळे रखडल्या याची वर्गवारी , त्या संबंधात धोरण ठरवणार, बांधकाम क्षेत्राऐवजी चटई क्षेत्रावर रेडिरेकनरची किंमत आणणार.

दि. 11 फेब्रुवारी 2020

·      क्षयरोग कंत्राटी कर्मचारी, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील रूग्णालयांचा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करणे आणि तसेच राज्य कामगार विमा व साकोली उपजिल्हा रूग्णालयाबाबत, विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
·      अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक. 
·      ब्रिटिश कौन्सिल इंडियाच्या संचालक बार्बरा विकहॅम,पश्चिम भारताचे सहायक संचालक वेनॉर्न डिसूझा आणि पश्चिम भारतासाठी शाळांचे संपूर्ण काम पाहणाऱ्या उर्वी शहा यांची शालेय शिक्षण
मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्यासोबत बैठक.गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ब्रिटिश कौन्सिलची मदत
घेण्याचे श्रीमती वर्षा गायकवाड यांचे सूतोवाच.
·      यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये परिवहन विभागाने 2 हजार साध्या परिवर्तन (लालपरी) बसेस खरेदी करण्यासाठी रु. 600 कोटीचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केल्याची परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती.
·      उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या उपस्थितीत राज्य तंत्रशिक्षण मंडळ- नियामक परिषदेची 32 वी बैठक. मंत्री महोदयांचे निर्देश :- राज्यामध्ये आदर्श कौशल्य विकास केंद्रे निर्माण करा, प्रत्येक विभागातील अडचणी लक्षात घेऊन त्यावर आधारित पदविका अभ्यासक्रम तयार करा.
·      उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विकासासंदर्भात बैठक. या विद्यापीठाच्या आवारामध्ये शंकरराव चव्हाण संशोधन केंद्र, संकुलाचे काम लवकर पूर्ण करण्याचे श्री. सामंत यांचे निर्देश.
·      कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात तीन व्यक्ती निरिक्षणाखाली,36 जणांना रुग्णालयातून घरी सोडवण्यात आल्याची,  आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.
·      कोरोना विषाणूग्रस्त वुहानमध्ये अडकलेल्या साताऱ्याच्या कु. अश्विनी पाटील हिच्याशी आरोग्य राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी संवाद साधून तिला दिलासा दिला. श्री.पाटील यांनी चीनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून अश्विनी पाटील हिला सुखरुपपणे मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. दोन आठवड्यापूर्वी महाराष्ट्रातील 26 विद्यार्थी भारतात परतले असून त्यांना आणण्यासाठी श्री. पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली.
·      अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या केरोसिन तेलाचा पुरवठा गरजूंना करण्याबाबत बैठक. गरीब जनतेसाठी केरोसिनच्या अटी, नियम शिथिल करण्याची श्री. भुजबळ यांची घोषणा.
·      ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन निवासी प्रयोजनार्थ दिलेली आहे, अशा  संस्थांमधील सदनिका  वापरण्याच्या अनुज्ञप्ती (लिव्ह ॲण्ड लायसन्स) वर दिलेली असेल तर या सदनिका  भाड्याने देताना, जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगीची आवश्यकता नाही, किंवा त्यांना त्याबाबत अवगत करण्याची गरज नाही तसेच कोणतेही अनुज्ञप्ती शुल्क (लायसन्स फी) भरण्याची आवश्यकता नाही, या संबधीचा शासन निर्णय महसूल विभागामार्फत नुकताच जारी.
·      कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद : महत्वाचे मुद्दे - कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या ४१७ आयटीआय तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या, त्यांच्या इच्छेनुसार ऑनलाईन पद्धतीने होणार, कौशल्य विकास विभागाचे पोर्टल सुरु, या ऑनलाइन प्रणालीमुळे बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक आणि सूत्रबद्ध पद्धतीने होणार,ग्रामविकास विभागानंतर ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविणारा कौशल्य विकास विभाग ठरला.
·      मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयक म्हणून आमदार श्री. रविंद्र वायकर यांची मंत्री पदाच्या दर्जासह नियुक्ती.
·      सोलापूर जिल्ह्यातील मौजे मोडनिंब व माढा या ठिकाणी नव्याने एमआयडीसी निर्माण झाल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने या ठिकाणी एमआयडीसी निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांचे निर्देश.
·      मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई,अतिथी संपादक असलेल्या ‘लोकराज्य’चा मराठी भाषा गौरव दिन (फेब्रुवारी 2020) विशेषांक  प्रकाशित.
·      आदिवासी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या खासगी आश्रम शाळा संस्था चालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
·      उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडून आपचे नेते श्री. अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन.
·      महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य, व पूनर्वसनासाठी राबविल्या जाणा-या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
·      वस्त्रोद्योग व बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत एल.ई.डी. मासेमारी संदर्भात बैठक. मंत्री महोदयांचे निर्देश :- सागरी मासेमारीसंदर्भातील सर्व अधिसूचनांची कडक अंमलबजावणी करा, परराज्यातील एकही मासेमारी नौका राज्याच्या हद्दीत येऊन यापुढे मासेमारी करणार नाही, याची दक्षता घ्या, एकही अनधिकृत पर्ससीन आणि एलईडी पर्ससीन नौका मासेमारी करू नये, यासाठी आवश्यक कारवाई करा, सागरी मत्स्योत्पादनाचे संरक्षण करून त्याचा लाभ महाराष्ट्रातील स्थानिक मच्छीमारांनाच मिळण्यासाठी विविध कायद्यांची व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा,मत्स्यदुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन पारंपरिक मच्छीमारांना न्याय द्या.
·      उद्योग मंत्री श्री. सुभाष  देसाई यांच्या हस्ते आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने जहांगिर आर्ट गॅलरी येथे आयोजित 102 व्या वार्षिक  कला प्रदर्शनाचे उद्घाटन.
मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी गठित उपसमितीची पहिली बैठक या समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. बैठकीला उपसमितीचे सदस्य नगर विकास मंत्री  श्री. एकनाथ शिंदे, महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री श्री.विजय वडेट्टीवार उपस्थित.
·      वनमंत्री श्री. संजय राठोड यांच्या उपस्थितीत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे राष्ट्रीय उद्यान विकास कामांचा व उद्यान विकास आराखडा वितरीत निधी व खर्चाचे नियोजन याबाबत बैठक. मंत्री महोदयांचे निर्देश :- उद्यानात सुरू असलेल्या निसर्ग माहिती केंद्र, बालोद्यान, टॅक्सीडर्मी केंद्र आदींच्या विकासकामांना गती द्या, सुरू असलेले काम हे निसर्गपूरक  व वनाला शोभेल असे करा, त्यामध्ये मातीच्या रंगाचा वापर करा, राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना जैवविविधता वनस्पतींची माहिती देण्यासाठी निसर्ग माहिती केंद्राचा विस्तार करा, नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ई सर्विलन्सची कामे करा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या चारही बाजूंनी  संरक्षित भिंती तातडीने उभारा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रावर असलेल्या अतिक्रमणाच्या पुनर्वसनाची कामे गतीने पूर्ण करा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमा.
·      राज्यमंत्री श्री. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत अकोला जिल्हातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक. ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे श्री. कडू यांचे निर्देश.
·      गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे (पूर्व) येथील मुख्यालयात आढावा बैठक. गृहनिर्माण राज्यमंत्री श्री. सतेज पाटील उपस्थित. मंत्री महोदयांचे निर्देश :- मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने सैफी-बुऱ्हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्ट (एसबीयूटी) च्या धर्तीवर कामाठीपुरा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करा, वास्तुविशारदांबरोबर झालेल्या चर्चेनुसार म्हाडाच्या मुंबईतील जुन्या वसाहतींचा समूह पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करा, पुनर्विकास करताना अशा इमारतींमध्ये मूळ रहिवाशांना देण्यात येणाऱ्या सदनिकांचे आकारमान निश्चित करण्यासंदर्भात धोरण तयार करा,म्हाडाच्या अखत्यारीत राज्यात उपलब्ध असलेल्या जमिनींचा अहवाल आठ दिवसात सादर करा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या महत्वाच्या शहरांलगत हरित पट्टयामधील आणि ना-विकसित क्षेत्रातील शासकीय भूखंडांची माहिती द्या, हे भूखंड म्हाडाला परवडणाऱ्या दरातील  गृहप्रकल्प राबविण्याकरिता देण्यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल सादर करा,बांधकाम क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञाचा उपयोग करून स्वस्त दरातील गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याकरिता  जागतिक स्तरावर निविदा मागवा,म्हाडाच्या अखत्यारीतील संक्रमण शिबिरातील भाडेकरूंची "अ", "ब" व " क"  वर्गातील पात्रता निश्चिती करिता  बायोमेट्रिक सर्वेक्षण करा, पथदर्शी प्रकल्प तत्वावर सर्वात प्रथम सायन येथील प्रतीक्षा नगर संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण महिन्याभरात पूर्ण करा.
दि. 12 फेब्रुवारी 2020
मंत्रीमंडळ निर्णय
·      शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय. दररोज 45 मिनिटाचे वाढीव काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारी पासून होईल.मुंबईसह सर्व कार्यालयांसाठी एकच वेळ.
·      राज्यातील बालसंस्थांमधील मुलांचे कल्याण आणि पुनर्वसन करण्याकरिता राज्य बाल निधी निर्माण करण्यास व त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग या विभागाचे नाव आता बहुजन कल्याण विभाग असे करण्यास मान्यता.
·       महाराष्ट्र राज्याचे हीरक महोत्सवी वर्ष शासनामार्फत थाटात साजरे करण्याचा निर्णय,  1 मे, 2020 पासून राज्यभरात कार्यक्रमांना सुरुवात करण्यास मंजुरी.

·      पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री श्री. सुनील केदार यांच्या उपस्थितीत दुग्ध व्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन या विभागांद्वारे दूध भेसळ रोखण्याकरिता आयोजित बैठक. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे उपस्थित. मोबाईल व्हॅनमुळे दुधाची जागेवर तपासणी करुन दुधाच्या दर्जाबाबत खात्री करणे शक्य असल्याने  दूध भेसळ करण्याऱ्यांवर जरब बसणार. अहमदनगर, पुणे या भागात दुध संकलन मोठ्या प्रमाणात होत असल्याने मोबाईल व्हॅनची तत्काळ अंमलबजावणी या ठिकाणी करण्याचे श्री. केदार यांचे निर्देश.   दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ तपासण्याकरिता अन्न व औषध प्रशासन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांचे जिल्हानिहाय संयुक्त पथक तयार करणार.
·      वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री श्री. अस्लम शेख यांच्या उपस्थितीत हाजी अली दर्गा नूतनीकरण व सौंदर्यीकरणासंदर्भात बैठक. मुंबईतील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या या दर्गाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश.
·      सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची 153वी बैठक. कांस (फ्रान्स) महोत्सवात चित्रपट निवडण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय.
·      कोल्हापूर चित्रनगरीचा दर्जा उन्नत करून चित्रीकरणासाठी अधिकाधीक प्रतिसाद मिळावा याकरिता सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे निर्देश.
·      उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या उपस्थितीत जादुटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी बाबत  बैठक. सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे उपस्थित.जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कायद्याची प्रचार-प्रसिद्धी प्रभावीपणे करण्याचे निर्देश. 
·      26 जानेवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंतच्या १७ दिवसात राज्यात २ लाखांहून अधिक नागरिकांना  मिळाला शिवभोजन थाळीचा लाभ.
·      कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना तसेच अभ्यासक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
·      पुण्यातील ‘एनआयबीएम’ संस्थेचा '५० वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रम' तसेच लोणावळा येथील इंडियन नेव्हल स्टेशन शिवाजी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचे पुण्यात आगमन.
·      सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत केंद्र पुरस्कृत योजनांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठीच्या राज्यस्तरीय समितीची बैठक. दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी या योजनांचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश.
·      आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्यामार्फत प्रसृत माहिती - मधुमेहींच्या रुग्णांची नोंदणी करण्यासाठी सिम्पल ॲप. भंडारा, वर्धा, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये 1 लाख 27 हजार 882 रुग्णांची नोंदणी. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, कोल्हापूर आणि सांगली या नऊ जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात सिम्पलॲपचा वापर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केला जाणार, या जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, एएनएम, औषध निर्माता यांचे प्रशिक्षण सुरु. उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांची नोंदणी या ॲपवर करण्यात येणार, उच्च रक्तदाबाच्या आजारावर नियंत्रणासाठी इंडिया हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह’ (आयएचसीआय) यांच्या मदतीने ॲपची निर्मिती.
·      अतिवृष्टीमुळे बाधित विदर्भातील शेतकऱ्यांना 68 कोटी 94 लाख  27 हजार रुपयाची आर्थिक मदत देणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांचे सूतोवाच.
·      कोरोना विषाणू : 41 प्रवाशांपैकी 40 जणांचा अहवाल निगेटिव्ह, मुंबई विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवाशांची तपासणी  केल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.
·      उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई  यांच्या उपस्थितीत नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2020’ या जागतिक परिषदेच्या निमीत्ताने उद्योजकांसोबत बैठक. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांसाठी हब तयार करण्याचे  उद्योगमंत्री श्री. देसाई यांचे सूतोवाच.
·      अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत, नाशिक येथे नवीन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्याबाबतची बैठक.
·      ५९ व्या भाजीपाला, फळे व फुलांच्या प्रदर्शन व स्पर्धेत राजभवन येथील उद्यानाला सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा फिरता चषक प्राप्त.
·      मराठी भाषी मंत्री श्री. सुभाष देसाई यांची पत्रकार परिषद. महत्वाचे मुद्दे :- कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी रोजी राज्यभर मराठी भाषेच्या संवर्धन व विकासासाठी विविध उपक्रम साजरे करणार,विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, श्री.पु.भागवत पुरस्कार, डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार असे चार विशेष पुरस्कार व साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीकरिता 35 वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी विशेष गौरव सोहळा आयोजित करणार, मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार,ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती अनुराधा पाटील यांना मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या प्रकाशन संस्थेस दिला जाणारा ‘श्री.पु.भागवत पुरस्कार पद्मगंधा प्रकाशन, पुणे या संस्थेला,मराठी भाषा संवर्धनासाठी योगदान देणारी व्यक्ती अथवा संस्थेस दिला जाणारा ‘भाषा संवर्धन पुरस्कार’ डॉ.अशोक केळकर यांना, मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारासाठी अनुक्रमे प्रा.आर.विवेकानंद गोपाळ व श्री.अनिल गोरे यांना घोषित. 
·      राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेचा एनआयबीएमसुवर्णमहोत्सवी सोहळा राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत संपन्न. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी, परिवहन तथा संसदीय कार्यमंत्री ॲड अनिल परब उपस्थित.
·      बालसंस्थांमधील मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि या  मुलांच्या पुनर्वसनाकरिता बाल न्याय निधीसाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतल्याची महिला व बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया.
·      मुंबई शहराचे आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेऊन शहरातील महत्वाच्या पर्यटनस्थळांचा विकास करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार आणि पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक. शहरातील पर्यटनस्थळांच्या संवर्धन आणि विकासासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे, असे श्री. पवार यांचे निर्देश. पर्यटन विकासाच्या अनुषंगाने शहरातील २२ महत्वाच्या ठिकाणांना प्राधान्य देऊन त्यांचा विकास करण्याचे श्री. ठाकरे यांचे सूतोवाच.
·      पुणे शहरातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी उपमुख्यमंत्री  श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ उपस्थित. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्याचे श्री. पवार यांचे निर्देश.
·      पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात एंटरटेनमेंट, हॉटेल व्यवसायिकांसोबत पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांची चर्चा. इव्हेंट, मनोरंजन आणि हॉटेलिंगसाठी लागणारी परवाना प्रक्रिया सुलभ करुन 'इज ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत या व्यवसायाला चालना देण्याचे श्री. ठाकरे यांचे सूतोवाच.

दि. 13 फेब्रुवारी 2020

·      केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाद्वारे स्थापित जेम्स ॲण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रोमोशन काऊंसिल यांच्या सौजन्याने आयोजित भारतीय आंतराष्ट्रीय ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.
·      सुदर्शन सीएसआर फाऊंडेशनच्यावतीने उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाख चौपन्न हजार एक्याऐंशी रुपयांचा धनादेश सुपूर्द.
·      सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाची बैठक. मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्यात 'मिनी चित्रपटगृह' (मिनी मिल्टिप्लेक्स) उभारण्यासारखे उपक्रम राबविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सकारात्मक असल्याचे श्री. देशमुख यांचे सूतोवाच.
·      लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी उपस्थित.
·      पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री. सुनील केदार यांच्या उपस्थितीत दुधातील भेसळ रोखण्यासंदर्भात विविध कंपन्यांचे सादरीकरण. महत्वाचे मुद्दे :- दुधाची भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार, दूध उत्पादक शेतकरी, संकलन केंद्र, दुधावरील प्रक्रिया केंद्र, या सर्व ठिकाणी क्यूआर कोड देण्यात येणार, दुधातील गुणवत्ता, दर्जा राखण्याकरिता शेतकरी दूध काढण्यासाठी हात मोजे वापरतो किंवा नाही,  दूध काढण्याचे भांडे, दूध संकलन केंद्राच्या ठिकाणचा परिसर स्वच्छ आहे किंवा नाही याची खात्री करणार, दूध संकलन केंद्र आणि दुधाची प्रक्रिया करण्यात येणाऱ्या ठिकाणी पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रीत करणार.
·      उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या उपस्थि‍तीत   राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विचारात घेऊन, नवीन महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी बृहत आराखडा तयार करण्याबाबत बैठक. मंत्री महोदयांचे निर्देश :- नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विचारात घेऊन तयार केलेल्या बृहत आराखड्यातील ज्यातील त्रुटी दूर करा, महाविद्यालयांमध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरु करा, स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करा.
·      उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली वाटुमल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, वरळी, मुंबई मधील कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात बैठक.
·      उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील डबेवाल्यांकरिता घरबांधणी, मुंबई डबेवाला भवन या मागण्यांसाठी  बैठक. मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, त्यांच्या मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश.
·      राज्यात व्हर्टीकल विद्यापीठ कॅम्पस सुरु करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध नसल्यामुळे, निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासाठी समिती गठीत करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांचे निर्देश.
·      अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत, नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सादरीकरण. नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधांयुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य देऊन शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश.
·      पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मुरूड व रायगड जिल्ह्यातील खारभूमी परिसरातल्या जमिनीवरील चुकीच्या नोंदी, श्रीवर्धन तालुक्यातील जमिनी वापरास बंदी, कासु गडब विभागातील खारभूमी योजनेअंतर्गत बंदिस्ती दुरूस्ती, खार बंदिस्ती होण्यासंदर्भात आढावा बैठक.खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट केलेल्या मुरूडवासियांच्या जमिनीच्या चुकीच्या नोंदी रद्द करण्याचे निर्देश.
·      गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित बांधकामाचा आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश :- सार्वजनिक बांधकाम विभागाने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करुन या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या निधीबाबतचा आराखडा तयार करा, यासाठी सुधारित प्रशासकीय आदेश काढा, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महाविद्यालयाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करा.
·      कृषी मंत्री एक दिवस शेतावरहा उपक्रमांतर्गत कृषी मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्यामार्फत मालेगाव तालुक्यातील वळवाडे, अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संबंधित शेतकऱ्यांची  विचारपूस.
·      महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2028 अंतर्गत 2500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री.
·      प्रवेश फी, विविध गुणदर्शन उपक्रम शुल्क (Extra Curriculum/Activity fee), विद्यापीठ विकास निधी, विद्यापीठ विद्यार्थी सहाय्य निधी/ कल्याण निधी, प्रयोगशाळा शुल्क, कॉलेज मॅगेजीन फी, विद्यापीठ क्रीडा निधी, विद्यापीठ विद्यार्थी विमा निधी, ग्रंथालय शुल्क, संगणक प्रशिक्षण फी, विद्यापीठ अश्वमेध निधी, युथ फेस्टिवल शुल्क, जिमखाना शुल्क, नोंदणी शुल्क, विद्यापीठ वैद्यकीय मदत निधी, विद्यार्थी ओळखपत्र शुल्क अशा 16 शुल्कांचा लाभ अनुदानित व विना अनुदानित/कायम विना अनुदानित  महाविद्यालयातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची बहुजन कल्याण विभागाचे मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांची माहिती.
·      कोरोना विषाणू : राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरिक्षणाखाली असल्याचे आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.
·      नगरविकास राज्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  नवी मुंबईतील प्रकल्प बाधितांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक. मंत्री महोदयांचे निर्देश :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामामुळे मच्छिमारांच्या योग्य पूनर्वसनासाठी सर्वेक्षण करा. सिडको प्रकल्पग्रस्त म्हणून काम  करणाऱ्या भूमिपुत्रांना शासनाच्या नियमाप्रमाणे किमान वेतन, सुट्ट्या, भत्ते, बोनस द्या, परिवहन कंपनी बंद पडल्यामुळे बेरोजगार झालेल्यांच्या उदरनिर्वाहासाठी उलवे, करंजाडे, द्रोणागिरी येथे भूखंड, काही ठिकाणी गाळे उपलब्ध करुन द्या.
·      गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांच्या हस्ते मुक्ता महाजनी यांच्या द कोडपुस्तकाचे प्रकाशन.
·      गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांबाबत बैठक. मंत्री महोदयांचे निर्देश :- मुंबईतील गिरणी कामगारांना 'ना विकास' क्षेत्रात एकत्रितरीत्या घरे देण्याचा  शासनाचा प्रयत्न, त्यादृष्टीने येत्या पंधरा दिवसात अहवाल सादर करा,बीडीडी चाळीतील रहिवाशांची पात्रता -अपात्रता निश्चित करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून बीडीडी सेलस्थापन करा,रहिवाशांच्या पात्रतेचे निकष ठरवा, अंधेरी येथील जुहू - ताज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, काळाचौकी येथील अभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, बांद्रा येथील नर्गिस दत्त नगर गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी सोडवा.

दि. 14 फेब्रुवारी 2020

·      औरंगाबाद येथील बजाज ऑटो लि.कामगार संघटना आणि भारतीय कामगार सेनेच्या कामगारांच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख 54 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सुपूर्द.
·      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे (आंगणेवाडी) येथील नाल्यावर प्रस्तावित असलेल्या लघु पाटबंधारे योजना मसुरे (आंगणेवाडी) या प्रकल्पास 22 कोटी 11 लक्ष 88 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची, मृद व जलसंधारण मंत्री श्री. शंकरराव गडाख यांची माहिती.
·      कोरोना विषाणू : राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षाची स्थापना, 361 खाटांची उपलब्धता करण्यात आल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.
·      मत्स्य व्यवसाय मंत्री श्री. अस्लम शेख यांच्या उपस्थितीत अवैध पर्ससीन मासेमारी, एलईडी मासेमारी तसेच मच्छिमारांच्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, मच्छिमार संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. मंत्री महोदयांचे निर्देश :- अवैध मासेमारी रोखण्यासाठी मासेमारी बंदरांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, मासेमारी करताना झालेल्या दुर्घटनेत मच्छिमार मृत्यू पडल्यास त्याच्या कुटुंबीयांना इतर विभागाच्या धर्तीवर किमान पाच लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव सादर करा. राज्य शासनाच्या कायद्यात सुधारणा करून अवैध मासेमारी करणाऱ्यांना दंडाची रक्कम वाढवा, परराज्यातील नौकांना दंड वाढवा, नौका जप्त करा.मासेमारी नौकांमध्ये इस्त्रोने तयार केलेल्या व्हेसल ट्रॅकिंग सिस्टिम अथवा ॲटोमेटिक इन्फॉर्मेशन सिस्टिम यंत्रणा बसवा.पर्ससीन मासेमारीचा पारंपरिक मासेमारीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या डॉ. सोमवंशी समितीच्या शिफारशीनुसार मूल्यांकनासाठी नवी समिती नेमा.
·      भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या (आयआयपीए) महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्यावतीने बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानात, द इव्हॉल्विंग पॅराडाइम ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन महाराष्ट्र सिन्स इंडिपेन्डन्स’, या विषयावर माजी मुख्य सचिव श्री. द.मा. सुकथनकर यांचे व्याख्यान.
·      कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे सूतोवाच.
·      महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार श्री. अरविंद सावंत यांची मंत्री पदासह नियुक्तीचा दर्जा.दि. 15 फेब्रुवारी 2020

·      रिपब्लिक ऑफ पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूसा यांचे मुंबईत आगमन.
·      संत सेवालाल महाराज यांच्या 281 व्या जयंतीनिमित्त वने, भूकंप व पुनर्वसन मंत्री  श्री. संजय राठोड यांच्यामार्फत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन.
·      राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'एक महानगर, दो गौतम' या पुस्तकाचे प्रकाशन.
·      सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. अमित देशमुख यांच्या हस्ते मुंबई जेरुसलेम महोत्सवाचे उद्घाटन.
·      दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताज येथे शहीद झालेल्या नागरिकांना रिपब्लिक पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूसा यांच्यामार्फत पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली.
·       फिक्की, सीआयआय आणि ॲसोचाम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, इंडियन पोर्तुगाल बिझनेस परिषदेला पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूसा उपस्थित. भारतीय उद्योजकांनी पोर्तुगालमध्ये अधिकाधीक गुंतवणूक करण्याचे मार्सेलो यांचे आवाहन.
·      राज्यपालांनी  पोर्तुगाल राष्ट्राध्यक्षांचे राजभवन येथे केले स्वागत.
·      पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूसा यांचे गोव्याकडे प्रयाण.
·      लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची मान्यता.
००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.