विद्यापीठ स्तरावर समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या व्हर्च्युअल 

क्लासरूमचे उद्घाटन 

मुंबई, दि. 6 :  विद्यापीठ स्तरावर समुपदेशन केंद्राची निर्मिती करून विद्यार्थ्यांना दर आठवड्यात मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिल्या.
      
मुंबई विद्यापीठात राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू आणि रजिस्ट्रार यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. 

या चर्चासत्रामध्ये एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणालीच्या ( IUMS) अंमलबजावणीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. ही प्रणाली राज्यातील पाच विद्यापीठांमध्ये सुरू आहे. उर्वरित विद्यापीठांमध्ये तांत्रिक बाबी दूर करून ही प्रणाली लवकर सुरू करावी, अशा सूचना श्री. सामंत यांनी दिल्या.

श्री. सामंत म्हणाले, विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम तयार करत असताना स्थानिक विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करावा. शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध होऊ शकेलयाचा विचार विद्यापीठांनी करावा, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

यावेळी व्यवसाय पदवी (B.Voc ) कार्यक्रम आणि विद्यार्थांच्या रोजगार वाढीकरिता विद्यापीठातील कौशल्य विकास उपक्रम याबाबत आढावा घेण्यात आला.

माहिती व तंत्रज्ञान प्रधान सचिव एस. श्रीनिवास, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव सुजाता सौनिक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि रजिस्ट्रार उपस्थित होते.
000
काशीबाई थोरात/वि.सं.अ./06/02/2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.