व्हर्टिकल विद्यापीठ कॅम्पससाठी समिती गठित करण्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 13 : राज्यात व्हर्टिकल विद्यापीठ कॅम्पस सुरु करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी तातडीने समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.   

यासंदर्भात विधानभवनात बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी त्यांच्या कामकाजाचे व विनियम करण्यासाठी मार्गदर्शन सूचना तयार करण्यात आल्या आहेत. त्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यासाठी बोंगिरवार समितीच्या शिफारशीनुसार शासनाने निर्णय घेतला आहे.

मुंबईसारख्या महानगरात जमिनीची उपलब्धता आणि संबंधित संस्थेकडे उपलब्ध असलेली इमारत, पायाभूत सुविधा, साधनसामग्री यासारख्या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी तातडीने समिती गठित करावी. या समितीने बोंगिरवार समितीचा अभ्यास करावा. तसेच शैक्षणिक सुविधा, संशोधन, विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा याचा अभ्यास करुन व्हर्टिकल विद्यापीठ कॅम्पस कसे सुरु करता येईल याचा अहवाल समितीने तातडीने द्यावा, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ तसेच विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000
काशिबाई थोरात/वि.सं.अ./13/02/2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.